PM Modi Warns Pakistan : पहलगाम येथील हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) प्रत्येक भारतीय संतापलेला आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक (PM Narendra Modi) सभेत बोलताना पाकिस्तानवर घणाघाती टीका करत असतात. आज राजस्थानातील एका जाहीर (Rajasthan News) सभेत पीएम मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर शब्दांत फटकारलं आहे. राजस्थानातील बिकानेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. भारत आपल्या हक्काचं पाणी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला देणार नाही. पाकिस्तानच्या अण्वस्त्र देश असल्याची धमकी आता भारत सहन करणार नाही. पाकिस्तानशी जर चर्चा करण्याची वेळ आलीच तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच्याच (POK) मु्द्द्यावर चर्चा होईल. पीएम मोदींचा पाकिस्तानला हा 3P असा इशारा होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्वात आधी सिंधू पाणीवाटप करार स्थगित (Indus Water Treaty) केला होता. 23 एप्रिल रोजी झालेल्या सीसीएसच्या बैठकीत सिंधू पाणीवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयाने पाकिस्तानात सध्या हाहाकार उडाला आहे. पाणी आणि रक्त बरोबर (India Pakistan Tension) वाहू शकत नाही असे पीएम मोदी अनेकदा म्हणालेही आहेत. यानंतर त्यांनी आज बिकानेर येथील सभेतही याची पुनरावृत्ती केली. भारताच्या हक्काचं पाणी आता पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत दिलं जाणार नाही. भारतात हल्ले घडवून गैरप्रकार करण्याच्या कृत्यांची किंमत पाकिस्तानला चुकवावीच लागेल.
पंतप्रधान मोदी यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की पाकिस्तानशी चर्चा करण्याची वेळ आलीच तर फक्त आणि फक्त पाकव्याप्त काश्मीरच्याच मुद्द्यावर चर्चा होईल. म्हणजेच काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे पाकड्यांचे मनसूबे आता कधीच सफल होणार नाहीत. युद्धविराम जाहीर होताच पीएम मोदींनी देशाला संबोधित केले होते. त्यावेळी देखील त्यांनी पाकिस्तानशी आता फक्त पीओकेच्याच मुद्द्यावर चर्चा होईल असे स्पष्ट केले होते.
पीएम मोदींनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रे, अणुबॉम्बच्या धमक्या आता भारत सहन करणार नाही असा इशारा दिला आहे. न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या आडून वाढणाऱ्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारत कठोर प्रहार करील. पीएम मोदींनी हा इशारा आज बिकानेर येथील सभेतून पाकिस्तानला दिला.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आपल्या धोरणात मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की आता भारतावरील कोणताही दहशतवादी हल्ला अॅक्ट ऑफ वॉर (Act of War) मानला जाईल. 10 मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
बांग्लादेश, अफगाणिस्तान, धरण अन् फायटर जेट; भारताच्या कोंडीसाठी चीनचे 4 मोठे डाव..