PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या भाषणादरम्यान मोदी कोणती मोठी घोषणा करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. उद्यापासून नवीन जीएसटी दर लागू होणार असल्याने पंतप्रधान मोदी (PM Modi) देशाला संबोधित करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे मात्र आतापर्यंत पंतप्रधान मोदी कोणत्या विषयावर देशाला संबोधित करणार (PM Modi Address) याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
#BREAKING: Prime Minister Narendra Modi will address the nation today at 5pm pic.twitter.com/SiboCXSmfO
— IANS (@ians_india) September 21, 2025
तर दुसरीकडे यापूर्वी देखील पंतप्रधान मोदी यांनी अनेक वेळा देशाला संबोधित केले आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्राला संबोधित करत कोरोना काळात लॉकडाऊनची घोषणा केली होती. तर त्यापूर्वी त्यांनी राष्ट्राला संबोधित करत नोटबंदीची देखील घोषणा केली होती.
मी ब्राह्मण, परमेश्वराचे मोठे उपकार आम्हाला आरक्षण नाही, नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मध्ये बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते. 8 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांनी राष्ट्राला संबोधित केले आणि 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती.
बग्राम एअरबेस परत करा नाहीतर… ट्रम्प यांची तालिबानला उघड धमकी
यानंतर त्यांनी 22 मार्च 2020 रोजी त्यांनी जनता कर्फ्यूची हाक दिली होती. तर 12 मे 2020 रोजी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली होती.