मुंबई : कॉंग्रेसनं (Congress)उद्योगपती गौतम अदाणींच्या (Gautam Adani) प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi)जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं गौतम अदाणींसाठी काम करत असल्याची टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा (Pawan Khera)यांनी केली आहे. ते मुंबईमध्ये (Mumbai)पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi)झालेली कारवाई कशा पद्धतीनं करण्यात आली, यावरही सर्वांचं लक्ष वेधलं. त्याचवेळी गौतम अदानींसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सातत्यानं काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
यावेळी सर्वात आधी गिरीश बापट यांना कॉंग्रेस पक्षाकडून श्रद्धांजली अर्पण करुन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांनी आपल्या पत्रकार परिषदेला सुरुवात केली. ते यावेळी म्हणाले की, जवळपास एक महिन्यापूर्वी आम्ही गौतम अदाणींच्या प्रकरणावर बोलण्यासाठी आलो होतो. एक महिना उलटून गेल्यानंतरही त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल, संजय राऊतांच सूचक ट्विट
पवन खेरा म्हणाले की, राहुल गांधींनी 7 फेब्रुवारीला संसदेत भाषण केलं होतं. त्यात त्यांनी दोन मुख्य प्रश्न विचारले होते की, अदाणींच्या कंपणीत 20 हजार कोटी रुपये कसे आले? आणि दुसरा प्रश्न केला की गौतम अदाणींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी काय संबंध आहेत? त्याचे काही फोटोही त्यांनी दाखवले. त्यात प्रश्न असा होता की, पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाला जातात, त्यांच्याबरोबर गौतम अदानी जातात,असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
त्याचबरोबर नीरव मोदी, मेहूल चोक्सी, ललित मोदींचं नाव घेऊन तुम्ही ओबीसी वर्गाचा अपमान केला आहे. नीरव मोदी, ललीत मोदींवरुनही जारदार निशाणा साधला आहे. आता मेहूल चोक्सींवरील रेड कॉर्नर नोटीसही संपूष्टात आली आहे. त्याचबरोबर राहुल गांधींना तुम्ही घराबाहेर काढू शकता पण त्यांनी देशातील जनतेच्या मनात घर केलं आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही त्यांना कसे काढणार असा सवालही यावेळी पवन खेरांनी केला आहे.
देशाला जोडण्यासाठी ज्यांनी संपूर्ण देशभरातून 4 हजार किलोमीटर चालतो. लोकांना भेटत चालला, त्याच्यावर तुम्ही चुकीचे आरोप करता की, हा देशाचे तुकडे करत आहेत. देशासमोर बेरोजगारीचं संकट आलेलं आहे. 400 रुपयांचं घरगुती गॅस सिलेंडर 1100 रुपयांना विकलं जात आहे. त्याच्यावरुन तुम्ही सर्वांचं लक्ष हटवण्यासाठी नवनवीन मुद्दे काढले जातात, असा आरोप यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांनी केला आहे.