महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल, संजय राऊतांच सूचक ट्विट
नवी दिल्ली : राज्यात सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन वाद पेटला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपाने आक्रमक भुमिका घेतली आहे. यातच महाविकास आघाडीचा भाग असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील याप्रकरणावरुन राहुल गांधीना सुनावल आहे. दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गटाने पाठ फिरवल्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या. परंतु होण्यापुर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणात भाग घेत राहुल गांधींना सुनावल आहे. सावरकर यांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, असं म्हणत पवारांनी राहुल गांधी यांना सुनावल आहे.
आता त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली त्यांच्या सोबत अनेक विषयावर सकारत्मक चर्चा झाली. सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी असे ट्विट करून राऊतांनी सांगितले.
श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी.— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2023
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. यावेळी अनेक पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. परंतु ठाकरे गटाचे खासदार या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण पेटलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर एका जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांना सुनावलं होत. यामुळे आता महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.