Girish Bapat : भाजपचा नेता गेला पण राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर; काकडे म्हणतात, दोस्ती निभवावी तर..

  • Written By: Published:
Girish Bapat : भाजपचा नेता गेला पण राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर; काकडे म्हणतात, दोस्ती निभवावी तर..

BJP Pune MP Girish Bapat Passes Away : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावललल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्या आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी होणार आहेत. तत्पुर्वी, त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे बापट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Girish Bapat : नगरसेवक, २५ वर्षे आमदार ते खासदार, गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

गिरीश बापट यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रीय येत आहेत. गिरीश बापट यांचे मित्र असलेल्या पुण्यातील अंकुश काकडे यांचीही यावर प्रतिक्रीया आली आहे. प्रतिक्रिया देताना अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले. अंकुश काकडे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत पण पुण्यातील गिरीश बापट यांच्या सर्वपक्षिय जवळच्या नेत्यांमध्ये अंकुश काकडे हे होते.

यावेळी बोलताना अंकुश काकडे म्हणाले की पुणे शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले गिरीश बापट माझे अतिशय जवळचे मित्र होते. गेली ३० ते ३५ वर्षे आम्ही राजकारणात एकत्र काम केले. गेल्या काही महिन्यांपासून गिरीश बापट श्वसनाच्या विकाराने आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा या तिन्ही ठिकाणी अतिशय उल्लेखनीय काम करणारा सहकारी गेला. याचे मला अतिशय दु:ख आहे. पुणे शहराची ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.

आपली प्रतिक्रिया देताना अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाले. त्यांना रडताना पाहून अनेकांना त्यांच्या मैत्रीची आठवण झाली. बापट आणि काकडे यांची मैत्री ही पुण्याच्या राजकारणात चर्चेचा विषय होता. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात हे नेते सोबत दिसून यायच.

Girish Bapat : रोहित टिळक विरोधात, राहुल गांधी प्रचाराला आले, तरीही बापटांनी गड राखला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube