We Are Sorry थेट मोदींचा व्हिडिओ ब्लॉक करणाऱ्या Meta ने मागितली माफी…

Meta On PM Modi Video मेटाने फेसबुकवरून पंतप्रधान मोदींची पोस्ट काढून टाकल्याबद्दल माफी मागत नेमके कारण सांगितले आहे.

Letsupp Image   2026 07 28T110259.106

Letsupp Image 2026 07 28T110259.106

PM Modi’s selfie video removed briefly from Facebook; Meta apologises : सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी Meta ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवरील व्हिडिओ काही काळासाठी हटवल्याप्रकरणी माफी मागितली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेला हा व्हिडिओ तांत्रिक त्रुटीमुळे चुकून हटवण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून, नंतर तो पुन्हा पूर्ववत करण्यात आला. Meta च्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले, हा व्हिडिओ चुकीने हटवला गेला होता. आता तो पुन्हा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

PM Modi Instagram Reel : पंतप्रधान मोदींचा इन्स्टाग्राम विक्रम; 24 तासांत 30 कोटींहून अधिक व्ह्यूज

केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने Meta आणि Instagram च्या जागतिक प्रमुखांना समन्स बजावत या प्रकाराबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. व्हिडिओ नेमका का हटवण्यात आला आणि त्यामागे कोणती प्रक्रिया होती, याचा सरकारकडून तपास केला जात आहे.

विद्यार्थ्यांना उद्देशून होता PM मोदींचा संदेश

गेल्या आठवड्यात मध्यरात्रीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. देशभरात पेपरफुटीच्या घटनांवरून आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या व्हिडिओत पंतप्रधानांनी पेपरफुटीच्या घटनांना सरकार अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले होते. तसेच परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सरकार आवश्यक सुधारणा करणार असल्याचा संदेशही दिला होता.

‘मित्रों’ नव्हे, तर ‘फ्रेंड्स’, पोर्ट्रेट अँगल अन् सेल्फी कॅमेरा; PM मोदी 3 मिनिटांत खरचं Gen Z चे फेव्हरेट झाले?

काही काळासाठी व्हिडिओ गायब

व्हिडिओ फेसबुकवरून काही काळासाठी हटवल्यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर Meta ने तांत्रिक त्रुटीची कबुली देत व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करून दिला. मात्र, या घटनेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट मॉडरेशन आणि तांत्रिक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

Exit mobile version