संसदेच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असतानाच विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला आहे. मागील एक तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर बोलत होते. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांवर टीका केल्याचं दिसून आलंंयं, पण मणिपूर घटनेवर एकही शब्द न उच्चारल्याने विरोधकांनी सभात्याग करत निषेध केला आहे.
आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाची गुंडगिरी; बंदुकीच्या धाकावर अपहरण करत व्यावसायिकाला मारहाण
अविश्वास प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनात विऱोधी पक्षांच्या सदस्यांकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देत आहेत. यावेळी मोदींनी मागील निवडणुकीत किती राज्यांनी काँग्रेसला नाकारलं सांगितलं आहे.
धमकी खरी ठरली! राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराची भर सभेत गोळ्या घालून हत्या; देशभरात खळबळ
तसेच देव दयाळू असतो, कोणाच्यातरी माध्यमातून आपल्या इच्छा पूर्ण करीत असतो. विरोधकांच्या प्रस्तावाला मी देवाचा आशिर्वाद मानतो. मी आधीही सांगितलं होतं, अविश्वास प्रस्ताव ही आमची नाहीतर विरोधकांची बहुमत चाचणी आहे. 2018 साली देखील विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. पण तेव्हाही विरोधकांकडे असलेलं मतदान त्यांना झालं नव्हतं. हा प्रस्ताव आमच्यासाठी शुभ मानत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून अविश्वास प्रस्तावावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होता. या चर्चेदरम्यान भाजपच्या सर्वच खासदारांनी उपस्थित राहण्याबाबतचा व्हिपदेखील बजावण्यात आला होता. कारण या चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार होते. मात्र, ज्या मणिपूर घटनेवरुन विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडलायं त्या घटनेवर अद्याप एकही शब्द पंतप्रधान मोदींनी न उद्गगारल्याने विरोधकांनी सभात्याग केलायं.