Download App

लोकसभेपूर्वी PM मोदींचा बेरोजगारीवर सर्जिकल स्ट्राईक: 70 हजार तरुणांना नोकरीतील नियुक्तीपत्र

Image Credit: Letsupp

PM Modi on Job fairs : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून रोजगार मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी तब्बल 70 हजार तरूणांना नियुक्ती पत्र दिले आहेत. यावेळी मोदी यांनी सांगितले की, देशात एक निर्णायक आणि स्थिर सरकार आहे. त्यामुळे तरूणांना रोजगार मिळत आहे. केंद्र आणि भाजप शासित राज्यांत वारंवार होणारे रोजगार मेळाव्यांबद्दल मला आनंद होत आहे. मात्र या अगोदरचे सरकर भ्रष्टाचार, योजनांमध्ये आफरातफरी करत होतं. असं देखील यावेळी मोदी म्हणाले. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने हा बेरोजगारीवर सर्जिकल स्ट्राईक करत तरूणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. ( PM Modi Criticize Congress on Job fairs )

काँग्रेसचा ऱ्हास कशामुळे झाला? राहुल गांधींच्या खास माणसानेच केली पीएचडी

या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मोदींनी विरोधकांवर निशाणा देखील साधला आहे. ते म्हणाले, जेव्हा सरकारी नोकऱ्यांचा विषय येतो. त्यावेळी घराणेशाही असलेल्या राजकीय पक्ष सुशासनाऐवजी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत होते. त्यांनी कोट्यवधी तरूणांचे स्वप्न चक्काचूर केले. त्यांचा विश्वास गमावला. पण 2014 नंतर जेव्हा भाजप सरकार आलं. तेव्हापासून निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आली आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केली आहे.

काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ! भारतात लोकशाही जिवंत आहे का?; ट्विटर प्रकरणी मोदी सरकारला सवाल

दरम्यान देशभरात 43 ठिकाणी या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागांसह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात या रोजगार मेळाव्या अंतर्गत तरूणांना नोकरीची नियुक्ती देण्यात आली. त्यात या नवीन कर्मचाऱ्यांना वित्त सेवा विभाग, टापाल विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, परमाणु ऊर्जा विभाग, महसूल विभाग, लेखापरीक्षा आणि गृह मंत्रालयासह विविध विभागांत नियुक्त करण्यात आले आहे.

त्याचबरोबर या रोजगार मेळाव्यात नियुक्त करण्यात आलेल्या या 70 हजार नवीन कर्मचाऱ्यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवरील ‘कर्मयोगी प्रधान’ ऑनलाइन मॉड्यूलद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी कुठेही, कोणत्याही उपकरणावर अभ्यास करण्यासाठी 400 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज