Download App

video : पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक; कोण काय म्हणालं?

या बैठकीत ट्रम्प यांनी भारताने तेल आणि वायू खरेदी करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आणि यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक

  • Written By: Last Updated:

PM Modi Donald Trump Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये आहेत. या दौऱ्यात त्यांची आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. (Trump) या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन्ही नेत्यांनी व्यापारी संबंध, अवैध स्थलांतर आणि जागतिक शांतता यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या वेळी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केले. बैठकीपूर्वी दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, जिथे त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

सकारात्मक संभाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत सांगितलं की, भारतातील जनतेने त्यांना तिसऱ्यांदा सरकार चालवण्याचा जनादेश दिला आहे आणि त्याच उर्जेने ते अमेरिकेसोबत काम करण्यास तयार आहेत. त्यांना प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं आणि भारतासोबत मजबूत व्यापारी संबंध निर्माण करण्याची वचनही दिलं..

PM मोदी अमेरिका दौऱ्यावर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसोबत यामुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

या बैठकीत ट्रम्प यांनी भारताने तेल आणि वायू खरेदी करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आणि यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ होतील, असं सांगितलं. त्यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या मागील भेटींची आठवण करून दिली आणि ह्युस्टनमध्ये आयोजित ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम आणि अहमदाबादच्या भेटीचा विशेष उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले की, त्यांचं भारतात झालेले स्वागत अविस्मरणीय होते आणि त्यांना भारत-अमेरिका भागीदारी आणखी मजबूत करायची आहे.

व्यापार करारावर ट्रम्प यांचं मोठं विधान

भेटीदरम्यान ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात आगामी काळात मोठे व्यापार करार होणार आहेत. भारताला तेल आणि वायू निर्यात करण्याबाबत अमेरिका उत्साहित आहे यावर त्यांनी भर दिला. याशिवाय ते म्हणाले, की पंतप्रधान मोदींनी त्यांचे जुन्या मित्रासारखे स्वागत केलं, ज्यामुळे त्यांना ‘नमस्ते ट्रम्प’ आणि ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमांची आठवण झाली.

—————

follow us