Download App

कुछ़ बड़ा होने वाला हैं! एकाच दिवशी शाह-मोदींची राष्ट्रपतींशी चर्चा; भेटीनंतर 5 ऑगस्ट तारीख चर्चेत

  • Written By: Last Updated:

Modi-Shah Meet’s President Murmu & 5th August Date Conection :  पावसाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.3) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. मोदी भेट घेऊन चार तास उलटतो नाही तोच याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीही राष्ट्रपती भवनात जाऊन मूर्मू यांची भेट घेतली. यापूर्वी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी १६ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती.मोदी-शहा यांच्या राष्ट्रपतींसोबत एकाच दिवसात झालेल्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत, ज्याचा संबंध ५ ऑगस्टशीही जोडला जात आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर 5 ऑगस्टची चर्चा का होतीये त्याबद्दल जाणून घेऊया…

तुम्ही खरे भारतीय असता तर…; भारतीय सैन्यावरील विधानावरून SC ने राहुल गांधींना झापले

दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या राष्ट्रपतींसोबतच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रपतींसोबत झालेल्या भेटीचा आणि संभाषणाचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. परंतु दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा लक्षात घेता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
या दोन्ही नेत्यांनी मूर्मू यांची भेट अशावेळी घेतली आहे जेव्हा पुढील उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली आहे. याशिवाय, बिहारमध्ये SIR प्रक्रियेवर विरोधी पक्ष सतत प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत, या भेटीचा ५ ऑगस्टशी काही संबंध आहे का, कारण सोशल मीडियावर मोदी-शाह यांच्या राष्ट्रपतींसोबतच्या भेटीचा संबंध जोडला जात आहे.

कुछ तो बडा होने वाला है!

मोदी आणि शाहंनी एकाच दिवशी राष्ट्रपतींची भेट घेतल्याने काही तरी मोठं घडणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, राजकीय विश्लेषक आणि राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्यांच्या मते सरकार मोठा निर्णय घेण्याचा किंवा पाऊल उचलण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, असे मानले जाते की सरकार संसदेत एक मोठे विधेयक आणणार आहे, त्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री राष्ट्रपतींना माहिती देण्यासाठी भेट घेतल्याचे बोलले जाता आहे.

मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण, हिंदीचा द्वेष नको; पालिका निवडणुकांसाठी ‘राज’ ठाकरेंचे आदेश

मूर्मूंची भेट आणि ५ ऑगस्टचं कनेक्शन

मोदी आणि शाह यांनी मूर्मू यांच्यासोबत घेतलेल्या भेटीचा सबंध 5 ऑगस्टशी जोडला जात आहे. कारण ५ ऑगस्ट २०१९ रोजी मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा आणि राज्याचे दोन भागात विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली होती. त्यामुळे उद्या मोदी सरकार काही मोठ्या संवैधानिक किंवा राजकीय निर्णयावर
विचार करू शकते, मग ती महत्त्वाची नियुक्ती असो किंवा राष्ट्रपती स्तरावरील निर्णय असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

खळबळजनक! आपल्याला आयोध्येतील राम मंदिर उडवायचय; बीडच्या तरुणाला पाकिस्तानातून सुपारी

संसदेत संवेदनशील विधेयके सादर होणार?

संसदेत अनेक संवेदनशील विधेयके सादर करण्याची चर्चा आहे, ज्यामध्ये समान नागरी संहिता (UCC) आणण्याची अटकळ आहे. उत्तराखंडमधील धामी सरकारने UCC लागू केले आहे. आसाम आणि गुजरातच्या भाजप सरकारांनी राज्य पातळीवर UCC आणण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही UCC बद्दल बोलले आहे. UCC हा भाजपच्या मुख्य अजेंड्याचा एक भाग आहे, ज्यामध्ये राम मंदिर बांधण्याचे आणि जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे स्वप्न साकार झाले आहे. त्यामुळे उद्या याबाबत काय घोषणा केली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us