Narendra Modi On INDIA Alliance: काँग्रेस व इंडिया आघाडीतील पक्षांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला घेरले आहे. उद्यापासून दिल्लीत काँग्रेस आंदोलन (INDIA Alliance) करत आहे. त्यावरून आता नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीला प्रत्युत्तर दिले आहे. देशाच्या विकासात विरोधक अडथळे निर्माण करत असून भारतविरोधी शक्तींना पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला आहे. विरोधी पक्षाचे काम सरकारच्या धोरणांना विरोध करणे आहे, मात्र विरोधकांनी आपली जबाबदारी सोडून विकासकामांमध्ये अडथळे आणण्यालाच राजकारण बनवले आहे, अशी टीका मोदी यांनी केली.
बाळासाहेबांनी संजय राऊतांना मुलाखतीतच दिल्या शिव्या! राज ठाकरेंचा मोठा खुलासा
गुजरातमधील एकतानगर येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांनी संविधानात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाने सरकारच्या धोरणांवर टीका करणे अपेक्षित आहे. मात्र, विरोधकांनी आपले कर्तव्य सोडून विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. देशविरोधी शक्ती भारताचे विभाजन करण्याचे कट रचत आहेत. देशातील नागरिकांना एकमेकांविरोधात उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जनतेने अशा शक्तींपासून सावध राहून एकजूट राहणे गरजेचे आहे, असेही मोदी म्हणाले.
सोशल मीडियाचा वापर करून अफवा पसरवल्या जातायत-नरेंद्र मोदी
सोशल मीडियाचा शस्त्राप्रमाणे वापर करून देशाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. भारताची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतविरोधी शक्ती कोणाला मदत करत आहेत आणि पडद्यामागे कोणाचे कोणाशी संबंध आहेत, याबाबत जनतेने जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. देशातून नक्षलवाद संपवण्यात यश आले असले, तरी वैचारिक पातळीवरील नक्षलवादाचा धोका अद्याप कायम आहे. अशा शक्तींविरोधात लढा सुरूच राहणार असल्याचे मोदी म्हणाले.
‘मोदी माझे व्यक्तिगत शत्रू आहेत का?’ संजय राऊतांच्या वक्तव्याने ‘बोध कीर्तन’ची चर्चा
2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य
भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प सरकारने केला आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेतून सशक्त आणि समृद्ध देश निर्माण करायचा आहे, असे मोदी म्हणाले.
