Download App

राजनाथ सिंह अन् अमित शाहंसाठी मोदींची तुफान बॅटिंग; काँग्रेसला घेतलं फैलावर

Image Credit: Letsupp

Pm Narendra Modi Speech : राजनाथ सिंह अन् अमित शाह यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी संसदेच्या अधिवेशनात तुफान बॅटिंग केली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला चांगलच फैलावर घेतलं आहे. राजनाथ सिंह आणि अमित शाह यांच्या कुटुंबाचा कोणताही पक्ष नसल्याचं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी दोघांसाठी बॅटिंग केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे विधान सडेतोडपणे काँग्रेसच्या घराणेशाहीवर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘हिशोब तर द्यावाच लागणार’; कथित खिचडी घोटाळ्यावरुन सोमय्या-राऊतांमध्ये धुमश्चक्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातल्या एकाच कुटुंबातील अनेक लोकं राजकारणात येत असतील तर काहीही गैर नाही. एकाच कुटुंबातील दोन किंवा दहा तरुणदेखील राजकारणात येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करु. मात्र, एकाच कुटुंबाने पक्ष चालवणं हे आम्हाला मान्य नाही. यासोबतच एकाच कुटुंबाभोवती पक्ष फिरणं हेही आम्हाला मान्य नाही. जे कुटुंब पक्ष चालवतो तो आपल्या सदस्याला प्राथमिकता देत असतो. ही घराणेशाही देशासाठी आणि लोकशाही धोकादायक, घातक असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं आहे.

Sai Tamhankar: ‘भक्षक’ सिनेमातील पोलीस अधिकारी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जून खर्गे, गुलाम नबी आझाद हे नेते घराणेशाहीला बळी पडलेले आहेत. देशातील कोणत्याही कुटुंबातील दोन किंवा दहा लोकं प्रगती करत असतील तर स्वागतच पण कुटुंबच पक्ष चालवतो. एका सदस्यानंतर त्याचा मुलगा अध्यक्ष होतो, हा लोकशाहीसाठी धोका आहे. हे आम्हाला मान्य नसल्याचं स्पष्टपणे मोदींनी सांगितलं आहे. यावेळी मोदी बोलताना विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मात्र, मोदींच्या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी मोदींना समर्थन दिलं.

शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्ध दमदार शतक, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

संसदेमध्ये अधिवेशनात काँग्रेसकडून नेहमीच विरोध केला जातो. केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेला काँग्रेसकडून विरोध करण्यात येत असतो पण योजना मोदींच्या नाहीत तर देशाच्या आहेत. एवढा तिरस्कार किती दिवस असणार, त्यामुळे देशाचा विकास खुंटलायं. विकसित भारताच्या रोडमॅपवर सविस्तर चर्चा केलीयं,. अर्थव्यवस्थेच्या मूलभूत गोष्टींवरही चर्चा झाली. भारताची मजबूत अर्थव्यवस्था जग प्रभावित झालं असल्याचंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.

दरम्यान, आगामी निवडणूका येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच आता मोदी सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अधिवेशनात मोदींकडून विरोधकांचा समाचार घेतला जात आहे.

follow us

वेब स्टोरीज