‘कोण नरेंद्र मोदी, कोण फडणवीस, कोण शिंदे? आजचा ‘रावण’ अजिंक्य नाही’; राऊतांचा महायुतीवर घणाघात

‘कोण नरेंद्र मोदी, कोण फडणवीस, कोण शिंदे? आजचा ‘रावण’ अजिंक्य नाही’; राऊतांचा महायुतीवर घणाघात

Sanjay Raut : रामाचा निर्धार पक्का होता. ज्या अन्यायाविरुद्ध लढायला मी उभा ठाकलो आहे ती जी लढाई मला लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही तर सामन्य आणि शूर योद्ध्यांच्या ताकदीवर लढायची आहे. म्हणून रामाचं महत्व शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता पण आज ठिकठिकाणी रावणच रावण दिसतात. दिल्लीत जा रावण, महाराष्ट्रात रावण. नाशिकमध्ये रावण. असे किती रावण पण एक लक्षात घ्या आपल्याला असं वाटत आजचा रावण अजिंक्य आहे तर तसं नाही. तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता. त्या रावणाला तर बालीने हरवलं होतं. त्यामुळे रावण अजिंक्य होता हे डोक्यातून काढून टाका. आजचा रावण अजिंक्य नाही. नाशिकमध्ये मी जे सांगितलं ते सत्य होणार कारण मी रामभक्त आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह महायुतीतील नेत्यांवर टीका केली.

‘आता भाजपमुक्त श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मोदींची तुलना, शक्यच नाही’ ठाकरेंनी ठणकावलं

नाशिक येथे ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना राऊत यांनी राज्यातील सत्ताधारी महायुती आणि भाजपवर घणाघाती टीका केली. राऊत पुढे म्हणाले, हनुमानानं रावणाच्या सभेत त्याचा अपमान यासाठी केला कारण त्यांना रावणाचा आत्मविश्वस तोडायचा होता. शत्रूचा आत्मविश्वास तोडायचा असतो. कोण भाजपा? कोण नरेंद्र मोदी? कोण देवेंद्र फडणवीस? कोण अजित पवार? कोण एकनाथ शिंदे? रावणाचा आत्मविश्वास तोडला म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला, अशी टीका राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरे रामासारखे संयमी 

प्रभू श्रीरामावर अन्याय झाला. तेव्हा त्याला भडकवण्याचे प्रयत्न झाले नसतील का. पण तरीही राम शांत राहिला. संधीची वाट पाहत राहिला. जसे आज उद्धव ठाकरे संधीची वाट पाहत आहेत. रामाचा तो संयम मी उद्धव ठाकरेंमध्ये पाहतो त्यामुळे रामाप्रमाणेच उद्धव ठाकरे. वेट अँड वॉच. आपलीही वेळ येईल, असे राऊत म्हणाले.

शिवसेनेचा निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही, संजय राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज