Download App

काँग्रेसचीच गॅरंटी नाही अन् माझ्या गॅरंटीवर प्रश्न..,; PM मोदींची जहरी टीका

Pm Narendra Modi On Congress : काँग्रेस नेत्यांनाच गॅरंटी नाही अन् ते माझ्या गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, संसदेत सुरु असलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणांबाबत थेटपणे भाष्य करीत कार्यपद्धतीवरुन सडेतोडपणे टीका-टीप्पणी केली आहे.

दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र देणारे 5 आमदार अन् CM शिंदेंच्या मंत्र्याचा दावा; नेमकं ‘पॉलिटिक्स’ काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देश तोडण्याचे नरेटिव्ह काँग्रेसने सेट केले आहेत. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. काँग्रेसने ओबीसींना पूर्ण आरक्षण दिलं नाही, ही काँग्रेस आम्हाला सामाजिक न्याय शिकवत आहे. काँग्रेस दहशतवाद सहन करणारी शत्रूच्या ताब्यात जमीन दिली, सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली असल्याचीही टीका मोदींनी केली आहे.

“निवडणूक आयोग म्हणजे तडजोड बहाद्दर!” पक्ष अन् चिन्हाच्या निर्णयावर ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

तसेच अर्थिक तूट वाढतेयं, अर्थव्यवस्था विकास कूर्मगतीने सुरु असल्याची कबुलीच मनमोहनसिंगांनी दिली होती. काहींसाठी टीका करणं नाईलाज आहे, काँग्रेस पक्षाचा जन्म ब्रिटीशांमुळेंच झाला आहे. इंग्रजांमुळे तुम्ही प्रभावित त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. इंग्रजांचे कायदे तुम्ही का बदलले नाहीत, त्यांची दंडसंहिता तुम्ही बदलली नाही
स्वातंत्र्यानंतरही गुलामी मानसिकता कोणी राबवली? अशा प्रश्नांचा भडीमार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी आलो आहे. मी आदरपूर्वक त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी आपली मते मांडून चर्चा अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सर्व आदरणीय सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. काहींनी केवळ आलोचना केली. टीका करणं ही त्यांची मजबुरी आहे. मी त्या दिवशी हे सांगू शकलो नाही, पण मी खर्गेजींचे विशेष आभार मानतो. मी खूप लक्ष देऊन ऐकत होतो. लोकसभेतील करमणुकीची उणीव तुम्ही भरून काढली, असा टोला मोदींनी लगावला.

दरम्यान, एवढ्या सगळ्या गोष्टी बोलण्याचं स्वातंत्र्य खर्गेंना कसं मिळालं? लोकसभेत ज्या मनोरंजनाची उणीव भासत होती ती त्यांनी भरून काढली. त्या दिवशी दोन कमांडो आले नव्हते आणि त्यांनी संधीचा फायदा घेत भरपूर चौकार आणि षटकार मारले. ऐसा मौका फिर कहा मिलेगा, हे लक्षात घेऊन खर्गेंनी भरपूर भाषण केलं. खर्गेचं भाषण ऐकून मनोरंजन झालं, असं मोदी म्हणाले.

follow us