Download App

400 पार करण्यासाठी मोदीचं कार्यकर्त्यांना १०० दिवसांच टार्गेट, ‘नव्या मतदारांना…’

  • Written By: Last Updated:

PM Narendra Modi : राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनाला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारणारे भाषण दिले. कार्यकर्त्यांना पक्षासाठी मेहनत घ्यावी लागेल. पुढील १०० दिवस नव्या उमेदीनं नव्या मतदारांना जोडून घेण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेलं, असं मोदी म्हणाले.

430 धावांवर टीम इंडियाचा डाव घोषित, जैस्वाल-सर्फराजची वादळी खेळी; इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य 

पंतप्रधान मोदी म्हणाले, पुढील 100 दिवस नव्या उमेदीने सर्वांना एकत्र काम करायचे आहे. आज मी पक्षाच्या राज्य संघटनांच्या अहवालांनी खूप प्रभावित झालो आहे. भाजपचे कार्यकर्ते सत्तेत असूनही खूप मेहनत घेत आहेत. आपल्याला पक्षााला नव्या मतदारांपर्यंत घेऊन जायचं आहे. वीन मतदारांना पक्षाशी जोडायचं आहे. भाजपचा कार्यकर्ता हे काम भारतमातेसाठी करत आहे. आपण राजनीती नाही, तर राष्ट्रहितीसाठी बाहेर पडलो, असंही मोदी म्हणाले.

“अजितदादांनी तीन वेळा शब्द फिरवला, आता विधानसभेला मदत केली तरच”.. अंकिता पाटलांचा थेट इशारा 

अबकी बार 400 पार –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणात तरुणांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, ‘आज 18 फेब्रुवारी असून या काळात 18 वर्षांचे झालेले तरुण देशाच्या 18व्या लोकसभा निवडून देणार आहेत. त्यामुळं पुढील 100 दिवस आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे. प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पक्षाला पोहोचलं पाहिजे. सर्वांचे प्रयत्न होतील तेव्हा भाजपला जास्तीत जास्त जागा मिळून देशसेवा होईल, असंही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, “आपल्याला प्रत्येक वर्ग, प्रत्येक समुदाय आणि प्रत्येक पंथावर विश्वास ठेवला पाहिजे. एनडीएला 400 चा आकडा पार करायचा असेल तर भाजपला 370 चा आकडा पार करावा लागेल.

यावेळी मोदींनी जैन संत आचार्य विद्यासागर यांनाही त्यांनी मोदींनी आपल्या भाषणा दरम्यान आदरांजली वाहिली.

…म्हणून सत्ता मागतोय
पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘भारताने आज प्रत्येक क्षेत्रात जी उंची गाठली आहे, आता देश ना छोटी स्वप्ने पाहू शकतो, ना छोटे संकल्प करू शकतो. आता स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही मोठेच असतील. मी माझ्या सुखासाठी आणि संपत्तीसाठी जगणारा व्यक्ती नाही. मी देशासाठी संकल्प घेऊन बाहेर पडलेला व्यक्ती आहे. देश आता प्रगती करत आहे. तुमच्याकडे सत्तेसाठी तिसरी टर्म मागत नाही. आणखी काही निर्णय घेण्यसाठी सत्ता मागत आहे, असं म्हणत मोदींनी येणाऱ्या काळातील आणखी काही मोठ्या निर्णयांचं संकेत दिले.

follow us