Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान विरुद्ध संताप धुमसत आहे. आज संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की दहशतवादाला कठोर प्रत्युत्तर देणं हाच आपला दृढ राष्ट्रीय संकल्प आहे. आपल्या प्रत्युत्तराच्या कारवाईची पद्धत काय असेल, टार्गेट कोणते असतील, वेळ काय असेल यांसारख्या ऑपरेशन्सचे निर्णय घेण्याची पूर्ण मुभा सैन्य दलांना राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत म्हणाले.
जवळपास दीड तास ही बैठक चालली. या बैठकीत पहलगाम हल्ल्यानंतरची सुरक्षा स्थिती, दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहीमा आणि भविष्यातील रणनितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याआधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना जम्मू काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. यानंतर आज सायंकाळी मोदींच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
एकाच आठवड्यात पाकिस्तानला 70 हजार कोटींचा फटका, भारताशी पंगा पडला महागात; काय घडलं?
दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी आयोजित जनसभेत बोलताना त्यांनी पहलगाम येथील हल्लेखोर दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत संदेश दिला. ज्यांनी कुणी हा हल्ला केला त्या अतिरेक्यांना आणि या हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्यांना त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसेल अशी शिक्षा करू असे पंतप्रधान मोदी या सभेत म्हणाले होते.
या हल्ल्यात देशवासियांना ज्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं त्यामुळे सगळा देश व्यथित झाला आहे. दुःखाच्या या प्रसंगात संपूर्ण देश पीडित कुटुंबांच्या सोबत आहे. या हल्ल्यात कुणी आपला मुलगा, कुणी भाऊ तर कुणी आपला जीवनसाथी गमावला आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Blackout : तांत्रिक बिघाडामुळे पोर्तुगाल स्पेनमध्ये अंधार; वीज पुरवठा खंडित, सर्व सेवा विस्कळित