एकाच आठवड्यात पाकिस्तानला 70 हजार कोटींचा फटका, भारताशी पंगा पडला महागात; काय घडलं?

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) आठवडा उलटून गेला आहे. यानंतर भारताने पाकिस्तान (India Pakistan Tension) विरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. भारताने हल्ला न करता पाकिस्तानचे मोठे नुकसान केले आहे. पाकिस्तानच्या शेअर बाजाराला मोठा झटका बसला आहे. स्टॉक मार्केटला जवळपास 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कराची स्टॉक एक्सचेंज 4.50 टक्क्यांपेक्षा जास्त खाली आला. आज मंगळवारी सुद्धा केएसईत 1100 अंकांची घसरण दिसून आली. दुसरीकडे भारताच्या शेअर बाजाराने मात्र शानदार कामगिरी केली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी दणका
पाकिस्तानच्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. कराची स्टॉक एक्सचेंज दुपारी पावणे दोनच्या सुमारास 100 अंकांच्या घसरणीसह 114007.40 अंकांवर व्यवहार करत होता. केएसई 100 व्यापार सत्रा दरम्यान 1130.78 अंकांच्या घसरणीसह 112935.57 अंकांवर आला होता. एक दिवसापूर्वी केएसई 100 मध्ये घसरण झाली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे पाकिस्तान स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याआधी 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या शेअर बाजारात पाच व्यापार सत्रांपैकी चार सत्रात घसरण झाली होती. या दिवशी कराची स्टॉक एक्सचेंज 118430.35 अंकांवर बंद झाला होता. यानंतर 23 आणि 24 एप्रिललाही शेअर बाजारात घसरण झाली होती. 25 एप्रिलला मात्र केएसई 100 मध्ये तेजी आली होती. यानंतर पुन्हा शेअर बाजार गडगडला. शेअर बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त होत आहे.
काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय
70 हजार कोटींचा फटका
काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजाराला मोठा झटका बसला आहे. 22 एप्रिलला कराची स्टॉक एक्सचेंजचा मार्केट कॅप 52.84 अब्ज डॉलर होता. 29 एप्रिलला 50.39 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. याचा अर्थ पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटला 2.45 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानी रुपयांत गणना केली तर ही रक्कम 70 हजार कोटी रुपये होतात.
भारतीय शेअर बाजारात तेजी
दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात मात्र तेजी आहे. सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ दिसून आली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आकड्यांनुसार 22 एप्रिल रोजी सेन्सेक्स 79,595.59 अंकांवर होता. 1065.72 अंकांच्या तेजीसह 29 एप्रिलला 80661.31 अंकांवर पोहोचला. याचा अर्थ गुंतवणूकदारांना एका आठवड्यात 1.33 टक्के परतावा मिळाला. तज्जांच्या मते आगामी काळात शेअर बाजारात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
कॅनडात लिबरल पार्टीला सरकार बनवण्यात सलग चौथ्यांदा यश; खलिस्तानी एनडीपीचा गेम ‘ओव्हर’