Download App

शरद पवारांची आठवण काढत मोदींनी उडवली अधीर रंजन चौधरींची खिल्ली

  • Written By: Last Updated:

PM Narendra Modi on Adhir Ranjan Chaudhary : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर मागील ३ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या तीन दिवसांत विरोधकांनी सरकारवर चांगल्याच फैरी झाडल्या. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान मोदींनी यावेळी शरद पवारांची (Sharad Pawar) आठवन काढत कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांची खिलल्ली उडवली. (PM Narendra Modi on Adhir Ranjan Chaudhar over motion of no confidence)

आज मोदी सभागृहात काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, त्यांनी भाषणाच्या सुरूवातीलच शरद पवारांवरून अधीर रंजन चौधरी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, आज देश विरोधी पक्षाकडे पाहत आहे आणि तुमचे शब्द ऐकतो आहे. मात्र प्रत्येक वेळी काँग्रेसने देशाला निराशेशिवाय काहीही दिलं नाही. विरोधी पक्षाचं जे धोरण आहे, त्यावर मी सांगेन की, ज्याचं वही खात्याचा काही ताळमेळ नाही, ते आज आम्हाला हिशोब मागत आहेत.या अविश्वास प्रस्तावादरम्यान अशा गोष्टी घडल्या ज्या कधी ऐकल्या नाहीत, पाहिल्या नाहीत आणि कधी कल्पनाही केल्या नाहीत. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे नाव बोलणाऱ्यांच्या यादीत नव्हते.

मोदींनी छाती ठोकून सांगितलं.. आता २०२८ मध्ये अविश्वास ठराव आणा… 

मोदी म्हणाले, मागची काही उदाहरणे पहा, 1999 मध्ये वाजपेयी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता. त्यावेळी शरद पवार यांनी चर्चेचं नेतृत्व केलं होतं. पुढं 2003 मध्ये सोनिया गांधी विरोधात होत्या, तेव्हा त्यांनी नेतृत्व केले. 2018 मध्ये मल्लिकार्जुन खर्गे हे नेते होते. त्यावेळी त्यांनी अविश्वास ठरावावरील चर्चा पुढे नेली. पण यावेळी अधीर बाबूचे काय झाले? त्यांची अवस्था कॉंग्रेसमध्ये वाईट झाली. त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही म्हणत खिल्ली उडवली.

काल अमित भाई अतिशय जबाबदारीने म्हणाले की, हे बरोबर वाटत नाही, त्यांना बोलू द्या आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना बोलू दिले, हा तुमचं औदार्य आहे. पण गुड का गोबर कैसे करना है? उसमे ये माहीर है, अशी टीका मोदींनी केली.

ते म्हणाले मला कळत नाही की अधीरबाबूंना साईडलाईन का केलं गेलं? कदाचित कोलकात्याहून फोन आला असावा. काँग्रेस त्यांचा वारंवार अपमान करते. आताही अधीर रंजन चौधरी यांचे नाव बोलणाऱ्यांच्या यादीत नाही, पण आम्हाला त्यांच्याविषी पूर्ण सहानुभूती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags

follow us