मोदींनी छाती ठोकून सांगितलं.. आता २०२८ मध्ये अविश्वास ठराव आणा…

  • Written By: Published:
मोदींनी छाती ठोकून सांगितलं.. आता २०२८ मध्ये अविश्वास ठराव आणा…

PM Modi Speech On No Confidence Motion In Parliament :  मणिपूर मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि. 10) उत्तर दिले. अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य करत मोदींनी छाती ठोकून सांगत आता 2028 मध्ये अविश्वास ठराव आणा असे ओपन चॅलेंज दिले.

PM Modi : कितीही नावं बदलंली तरी खरं रूप समोर येईल; इंडिया नावावरून मोदींचा विरोधकांवर निशाणा

विरोधकांच्या नो बॉलवर सत्ताधाऱ्यांचे चौकार-षटकार

सभागृहात बोलण्यास सुरूवात करताना मोदींनी विरोधकांन 2018 सालीदेखील सांगितलं होतं, तुम्ही 2023 साली पूर्ण तयारी करुन या, पण विरोधक पूर्ण तयारी करुन येत नाहीत. त्यामुळे सभागृहात फिल्डिंग विरोधकांची होती पण बॅटिंग सत्ताधारीचं करत होते. सत्ताधारी विरोधकांच्या ‘नो बॉलवर चौकार, षटकार’ मारत होते, पण विरोधक ‘नो’ बॉलच टाकत होते असा मिश्लिल टोला देखील मोदींनी लगावला.

Video : मोदी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हेंचा परखड सवाल

HAL, LIC वरून हल्लाबोल

पुढे बोलताना मोदींनी विरोधकांकडून HAL आणि LIC कंपन्यांवरून करण्यात येणाऱ्या टीकेलाही सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, जगात आपल्या संरक्षणासाठी हेलिकॉप्टर बनवणारी सरकारी कंपनी HAL ची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला. विरोधकांकडून संबंधित कंपनीच्या कामगारांना भडकवले जात आहे. मात्र, यानंतरही HAL एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचली आहे.

एलआयसीबाबत बोलताना मोदी म्हणाले की, गरीबांचा कष्टाचा पैसा सत्ताधाऱ्यांनी उधळून लावला अशी टीका करण्यात आली होती. पण आज हीच कंपनी एका मजबूत स्थितीत आहे. विरोधकांची सरकारी कंपनीवरील ही टीका सरकारी कंपनीवर शेअर मार्केटमध्ये रूची असणाऱ्यांसाठी गुरूमंत्र अस्ल्याचे मोदी म्हणाले.

मोदी तेरी कबर खुदेगी ही विरोधकांची आवडती घोषणा

‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ ही विरोधकांची आवडती घोषणा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मात्र, विरोधकांच्या टीका माझ्यासाठी एखाद्या टॉनिकप्रमाणे आहे. विरोधकांचे काळे कपडे आमच्यासाठी शुभ असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

हे काय! सुनील तटकरे विरोधी बाकांवर; श्रीनिवास पाटलांच्या शेजारी बसून ऐकलं PM मोदींचं भाषण

जनतेचे आभार अन् 2024 मध्ये विजयाचा विश्वास

यावेळी मोदींनी देशातील जनतेने वारंवार भाजप सरकारवर विश्वास व्यक्त करत देशातील करोडो नागरिकांचे आभार व्यक्त केले.अविश्वास प्रस्ताव ही आमच्या सरकारची कसोटी नाही, तर ती विरोधकांची चाचणी आहे आणि घडलेही तसेच. मतदानावेळी पाहिजे तेवढी मते एकत्र करण्यात विरोधक सपशेल फेल झाले.

यावेळी मोदींनी 2024 च्या निवडणुकांमध्ये सर्व रेकॉर्ड मोडून भाजप सरकार परत सत्तेत येईल. एवढेच नव्हे तर, 2024 च्या निवडणुकीत एनडीए आणि भाजपा सर्व जुने रेकॉर्ड मोडून काढेल असा विश्वासही व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube