Video : मोदी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हेंचा परखड सवाल

Video : मोदी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हेंचा परखड सवाल

Amol Kolhe on PM Modi : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर मागील ३ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. आज राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी अविश्वास ठरावावर बोलताना भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार शेतकरी विरोधी असून सरकारचं डोक ठिकाणावर आहे का, असा सवाल त्यांनी केला. (Amol Kolhe on PM Modi goverment over motion of no confidence)

कोल्हे म्हणाले, मी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ बोलत आहे. सरकारच्या कार्यपद्धतीकडे पाहून मला गांधीजींच्या तीन माकडांची आठवण देते. सरकारच्या विरोधात काहीही ऐकू नका, निवडणुका सोडून देशाची काय परिस्थिती आहे ते पाहू नका आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची बोलती बंद करा. मग या सरकारवर विश्वास ठेवायचा तरी कसा ? जे सरकार महागाईवर बोलत नाही, आर्थिक वाढीचे आकडे तर फेकतात, पण दरडोई उत्पन्नावर बोलत नाही. गृहमंत्र्यांनी काल अगदी योग्य विधान केलं की, आकडे कधीच खोटे बोलत नाहीत. यामुळं अर्थव्यवस्था जेव्हा पाचव्या क्रमांकावर पोहोचते, तेव्हा दरडोई उत्पन्नात देश १४१ व्या क्रमांकावर आहे. तर काय देशाची संपत्ती काही निवडक लोकांच्याच हातात जात आहे का? असा सवाल त्यांनी केला.

2G घोटाळा, अहंकारी गट अन् संधीसाधू; ज्योतिरादित्य सिंधियांनी विरोधकांना खडसावलं… 

शेतकरी प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारच्या धोरणांवर भाष्य केलं. ते म्हणाले, किसान सन्मान निधीबाबत या सरकारने अनेक भाषणांत विधाने केली आहेत. मात्र खते आणि बियाणांच्या किमती चार ते पाच पटीने वाढल्या आहेत. यावर सरकार काही बोलत नाही. गेल्या चार-पाच वर्षांपासून आमचे शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत असताना हे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला गेले नाही. तीच स्थिती आज कांद्याच्या भावाची आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या लोकसभा मतदारसंघातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने पंतप्रधानांना पत्र लिहून आत्महत्या केली. याचे कारण आपले चुकीचे निर्यात धोरण आहे, असं ते म्हणाले.

63 मध्ये मून टेक्नॉलॉजीसारख्या कंपनी 13,000 गुंतवणूकदारांचं नुकसान करते. 5600 कोटींचा घोटाळा करते, पण तरीही महाराष्ट्राचं सरकार एमपीआयडी कायद्यांतर्गत कारवाई करत नाही. कोणाच्या इशाऱ्यावर हा प्रकार घडत आहे? म्हणूनच जे सरकार सर्वसामान्यांचे सरकार नाही, त्यावर आमचा विश्वास नाही. म्हणूनच मी अविश्वास ठरावाला पाठिंबा देतो…पंतप्रधान मोदी यांना नुकताच लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी त्यांचे अभिनंदन. पण त्याचवेळी त्यांना लोकमान्य टिळकांच्या एका वाक्याची आठवण करून देतो की, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? हे आत्मचिंतन व्हायला हवं, असं कोल्हे म्हणाले.

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube