Download App

कर्नाटक निवडणुकीत आरोप- प्रत्यारोपांची राळ; मोदी म्हणाले, काँग्रेसकडून मला 91 वेळा शिवीगाळ

  • Written By: Last Updated:

PM narendra modi on congress : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections in Karnataka) मतदानाला अवघे काही दिवस राहिले असताना आरोप- प्रत्यारोपाची राळ उठली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी (Congress president Mallikarjun Kharge) एक वादग्रस्त विधान केलं. पीएम मोदी हे विषारी सापाप्रमाणे आहेत. तुम्ही त्याला विष समजा अगर समजू नका, मात्र, ते चाखलं तर मरून जाल, अशा शब्दांत समाचार घेतला. यानंतर आता BJP कडून कॉंग्रेस आणि खर्गेंवर जोरदार टीका केली जातेय. खुद्द पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Modi) कॉंग्रेसवर निशाणा साधला.भ्रष्टाचार उघड करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काँग्रेस तिरस्कार करते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या निवडणुकीच्या निमित्तानेही काँग्रेसने मला पुन्हा एकदा शिवीगाळ करायला सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या लोकांनी मला 91 वेळा शिव्या दिल्याच त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पीएम मोदींनी कर्नाटकातील बिदर येथे पहिली जाहीर सभा घेतली. या सभेला संबोधित करतांना त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सामान्य माणसाबद्दल बोलणाऱ्या, त्यांचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या, त्यांच्या स्वार्थी राजकारणावर हल्ला करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काँग्रेस तिरस्कार करते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या निवडणुकीतही आता काँग्रेसने मला पुन्हा एकदा शिवीगाळ देणं सुरू केलं आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी मला 91 वेळा शिव्या दिल्या आहेत. या अपमानांजन्य शब्दांवर वेळ वाया घालवण्यापेक्षा काँग्रेसने सुशासनासाठी एवढी मेहनत घेतली असती, तर त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली नसती, अशी परखड टिप्पणीही त्यांनी केली.

‘कर्नाटक निवडणूक मोठी भूमिका बजावेल’
मोदी म्हणाले, “कर्नाटक विधानसभेची ही निवडणूक केवळ 5 वर्षांसाठी सरकार स्थापन करायला नाही, तर कर्नाटक राज्याला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी आहे. ही निवडणूक विकसित भारतासाठी कर्नाटकची प्रमुख भूमिका निश्चित करणार आहे.” आणि जेव्हा कर्नाटकचा प्रत्येक कोपरा विकसित होईल तेव्हाच भारताचा विकास होईल. बिदरचे आशीर्वाद यापूर्वीही मिळाले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ही निवडणूक फक्त जिंकण्यापुरती नाही, तर कर्नाटकला देशातील नंबर 1 राज्य बनवण्याचा आहे. सर्व क्षेत्रांचा विकास झाला तरच राज्याचा विकास होऊ शकतो. ही निवडणूक राज्याची भूमिका ठरवेल.

‘काँग्रेसने समाजात फूट पाडली’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजपने करोडो माता-भगिनींची बँक खाती उघडली, सरकारी मदत थेट त्यांच्यापर्यंत पोहोचली, त्याची व्यवस्था भाजपने केली, भाजपने सुरक्षित कर्जाची व्यवस्था केली, भाजपने मोफत राशनची व्यवस्था केली. आमच्या बंजारा काँग्रेसने कधीच कॉम्रेडची पर्वा केली नाही, पण आम्ही त्यांना विकासाशी जोडले. भाजपच्या या सेवांमध्ये काँग्रेसने समाजात फूट पाडली आहे. जात, धर्म, पंथ या आधारावर विभागले गेले आणि केवळ शासनाच्या नावाखाली तुष्टीकरणाला प्रोत्साहन दिले.

कर्जत बाजार समितीत रोहित पवार-राम शिंदेंना बरोबरीत जागा, आता फेर मतमोजणी

काँग्रेसने गरिबांच्या समस्या कधीच समजून घेतल्या नाहीत, गरिबी पाहिली नाही, असं पीएम मोदी म्हणाले. काँग्रेस हा पक्ष कोणत्याही गोष्टीत राजकारण करतो आणि विकासातही राजकारण करून अडथळे आणणारा हा पक्ष आहे. ते म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या काळात गरिबांसाठी घरे बांधण्याचा वेग मंदावला होता. दोन इंजिनांचे सरकार आल्यानंतर कर्नाटकातील गरिबांना सुमारे 9 लाखांची पक्की घरे मिळतील, असे ठरले होते. भाजपने बिदरमध्ये सुमारे 30,000 घरे बांधली, म्हणजे बिदरच्या 30,000 बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवले.

 

 

Tags

follow us