Download App

PM मोदीच करणार बांग्लादेशचा फैसला, अमेरिकेकडून फ्री हँड; ट्रम्प यांची मोठी घोषणा

एकूणच बांग्लादेशचा बंदोबस्त करण्याबाबत अमेरिकेकून भारताला फ्री हँड मिळाल्याची चर्चा जागतिक राजकारणात रंगली आहे.

Donald Trump big Decision on Bangladesh : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या (PM Narendra Modi) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पीएम मोदी यांनी अनेक घोषणा केल्या. भारताला त्रास देणाऱ्या बांग्लादेशचाही बंदोबस्त करण्याच्या दिशेने डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. बांग्लादेशचा निर्णय आता पंतप्रधान मोदीच करतील अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी देऊन टाकली. एकूणच बांग्लादेशचा बंदोबस्त करण्याबाबत अमेरिकेकून भारताला फ्री हँड मिळाल्याची चर्चा जागतिक राजकारणात रंगली आहे.

बांग्लादेशात सध्या (Bangladesh Crisis) अराजकतेची स्थिती आहे. येथील अल्पसंख्यांक हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. या हल्ल्यांना रोखण्यात बांग्लादेशातील अंतरिम सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या संकटात अमेरिकेची कोणतीच भूमिका नाही असे ट्रम्प म्हणाले. आता बांग्लादेशचा जो काही निर्णय करायचा असेल तो पीएम मोदीच करतील असेही ट्रम्प यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

पत्रकार परिषदेत रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाबाबतीत (Russia Ukraine War) प्रश्न विचारण्यात आला. तसेच बांग्लादेशातील संकटाबाबतही माध्यमांनी प्रश्न विचारला. यावर ट्रम्प म्हणाले, बांग्लादेशातील संकटात अमेरिकेचा काहीच सहभाग नाही. बांग्लादेशच्या मुद्द्यावर उपाय शोधण्याची जबाबदारी मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवत आहे.

पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश; पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात बैठक, मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील…

याच दरम्यान रशिया आणि युक्रेन यांच्यातील यु्द्ध समाप्तीत भारताची भूमिका काय असा प्रश्न पीएम मोदींना विचारण्यात आला. यावर मोदी म्हणाले, युद्ध समाप्त करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जो पुढाकार घेतला आहे त्यात आमेचही सहकार्य आहे. या युद्धाच्या काळात भारत तटस्थ राहिला असे जगातील अनेक देशांना वाटते. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. भारत कधीच निष्पक्ष राहिला नाही. भारत नेहमीच शांततेच्या बाजूने राहिला आहे.

ज्यावेळी मी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना भेटलो त्यावेळीही मी सांगितले होते की सध्याचं युग युद्धाचं नाही. तोडगा युद्धाच्या मैदानात काढला जाऊ शकत नाही. फक्त चर्चा आणि संवादाच्या माध्यमातूनच यावर उपाय निघू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची गुरुवारी ओव्हल ऑफीसमध्ये चर्चा झाली. या दरम्यान व्यापारापासून ते अवैध प्रवासी अशा महत्वाच्या मुद्द्यांचा यात समावेश होता. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात विविध घोषणा आणि निर्णयांची माहिती दिली.

बांग्लादेशची भारताकडे मागणी काय

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. भारताने शेख हसीना यांना बांग्लादेशच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली जात आहे. परंतु, भारत सरकारने असा कोणताच निर्णय घेतलेला नाही. भविष्यातही असा काही निर्णय होईल याची काहीच शक्यता नाही. बांग्लादेशातील सत्ताधाऱ्यांकडून विविध मार्गांनी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

follow us