पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश; पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात बैठक, मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील…

Big Sucess To India In First Modi Trump Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरच्या या पहिल्याच भेटीत भारताला एक मोठं यश मिळालं आहे. (Modi) मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर हूसैन राणा याला भारताच्या हवाली करण्याची तयारी अमेरिकेने दाखवली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर हूसैन राणाला भारताच्या ताब्यात देण्याचा निकाल दिल्यानंतर आता अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनीही याला मंजुरी दिली आहे.
175 जणांचा मृत्यू
मूळचा पाकिस्तानी असलेला तहव्वूर हूसैन राणा हा कॅनडामध्ये उद्योजक म्हणून काम करायचा. तहव्वूर हूसैन राणाचा 26/11 च्या हल्ल्यात सहभाग असल्याचं सिद्ध झालं आहे. 26/11 च्या हल्ल्यात 175 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामध्ये 300 जण जखमी झालेला. सदर हल्ल्यासाठी रेकी करणे आणि त्यासंदर्भातील नियोजनामध्ये सहभाग असल्याचे तहव्वूर हूसैन राणाविरुद्धचे आरोप सिद्ध झाले आहेत. आता त्याला भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे.
“मला हे सांगायला आनंद होतोय की माझ्या सरकारच्या प्रशासनाने कट रचणारा आणि जगातील सर्वात वाईट व्यक्तींपैकी एक असलेल्याच्या (तहव्वूर हूसैन राणाच्या) प्रत्यार्पणला संमती दिली आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्याचा कट रचणाऱ्याला भारतात कायदेशीर पद्धतीने शिक्षा दिली जाईल. त्याला भारतात परत पाठवलं जाणार आहे,” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
मोदींनी मानले आभार
ट्रम्प यांनी ही घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. “मुंबई हल्ल्याचा कट करणाऱ्याला भारतामध्ये खटला चालवण्यासाठी प्रत्यार्पण केलं जाणार आहे. यासाठी मान्यता दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो,” असं मोदी म्हणाले.
तहव्वूर राणाचे सर्व मार्ग बंद
तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथे तुरूंगात आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेविड हेडलीशी त्याचे संबंध असल्याचा आरोप राणावर आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नाइन्थ सर्किट न्यायालयाने प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन केले जाऊ शकते, असे सांगितले होते.
मुंबईवर केलेला दहशतवादी हल्ला योग्यच होता, अशी कबुलीही राणाने दिल्याचे सुनावणी दरम्यान न्यायाधीश मिलान स्मिथ यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राणाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.राणाला ही शेवटची संधी होती. याआधी त्याने अमेरिकेच्या विविध न्यायालयांमध्ये केलेले अपील फेटाळले गेले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळून त्याचे प्रत्यार्पण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.