Download App

अमेरिका-चीनला शह देण्याची तयारी, PM मोदींचा ब्रिटन अन् मालदीव 4 दिवसांचा दौरा ठरला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीवच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत

  • Written By: Last Updated:

PM Modi UK Maldives Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवारपासून ब्रिटन (Britain) आणि मालदीवच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रात द्विपक्षीय संबंध मजबूत करणे हा आहे.

Eng vs Ind 4th Test : चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल, ‘हा’ भारतीय खेळाडू बाहेर 

पंतप्रधान मोदी 23 ते 26 जुलै 2025 दरम्यान ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आणि म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी त्यांच्या भेटीच्या पहिल्या टप्प्यात ब्रिटनला भेट देतील. तिथं ते ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांची भेट घेतील. मोदी स्टारमर यांच्यासोबत भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर (FTA) सही करतील. हा करार भारतातून ब्रिटनला होणाऱ्या 99% निर्यातीवरील शुल्क कमी करेल आणि ब्रिटिश उत्पादनांना भारतात प्रवेश सुलभ करेल. या भेटीत दोन्ही नेते अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील.

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांनाही भेटण्याची शक्यता आहे.

न्या. यशवंत वर्मांविरुध्द महाभियोग प्रस्तावाची तयारी, किरेन रिजीजू यांनी काय सांगितलं? 

पंतप्रधान मोदी मालदीवलाही भेट देणार
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जुलै रोजी मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतील. राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून मोदी २५ ते २६ जुलै दरम्यान मालदीवचा दौरा करत करत आहे. पंतप्रधान मोदींचा मालदीवचा हा तिसरा दौरा असेल.

मालदीवच्या काही नेत्यांनी ‘इंडिया आउट’ मोहिम उघडली होती. तसेच त्यांच्या चीन समर्थक भूमिकेमुळे अलीकडच्या काळात भारत-मालदीव संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मोदी प्रथमच मालदीव जात आहे. भारत-मालदीव संबंध सुधारण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

follow us