न्या. यशवंत वर्मांविरुध्द महाभियोग प्रस्तावाची तयारी, किरेन रिजीजू यांनी काय सांगितलं?

Kiren Rijiju : संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session of Parliament) सोमवार (२१ जुलै) पासून सुरू होत आहे. सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनीही त्यांचे अजेंडे तयार केले आहेत. या अधिवेशनात न्यायमूर्ती यशवंत वर्मा (Justice Yashwant Verma) यांच्याविरुद्ध सरकारकडून महाभियोग (Impeachment) प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. याबाबत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) म्हणाले की, न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये एकमत घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भोंदू ज्योतिषाने तरुणीला एकांतात बोलावलं अन्…. पुण्यातील धक्कादायक घटना समोर
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्तावाची प्रक्रिया सध्या चर्चेत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी आणि सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेल्या यशवंत वर्मा यांच्या नवी दिल्लीतील सरकारी निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आज माध्यमांशी बोलतांना रिजीजू यांनी स्पष्ट केले की, सर्व राजकीय पक्षांशी चर्चा झाली असून, बहुतेक पक्ष वर्मा यांना पदावरून हटवण्याच्या बाजूने आहेत. हे एकट्या सरकारने उचललेले पाऊल नाही… महाभियोगासाठी खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत, १०० हून अधिक सदस्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याबाबतच प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात सरकार मांडू शकते, असं ते म्हणाले.
हमी घ्यायची तर रमी खेळतोय; जितेंद्र आव्हाडांचा कृषिमंत्री कोकटेंच्या ‘त्या’ व्हिडीओवरून निशाणा
सर्वपक्षीय बैठकीला 51 राजकीय पक्ष उपस्थित..
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर रिजिजू यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुढं ते म्हणाले की, संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या अधिवेशनात एकूण ५१ राजकीय पक्ष आणि स्वतंत्र खासदार सहभागी होते. या ५१ पक्षांचे ५४ सदस्य बैठकीला उपस्थित होते. ४० खासदारांनी त्यांच्या पक्षांच्या वतीने आपले विचार मांडले. सर्व राजकीय नेत्यांनी त्यांच्या पक्षांची भूमिका आणि या अधिवेशनात त्यांना कोणते मुद्दे मांडायचे आहेत ते सांगितले.
सरकारने सर्वांच्या विनंत्या लक्षात घेतल्या आहेत. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी चांगल्या समन्वयाने एकत्र काम करावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण वेगवेगळ्या विचारसरणीचे राजकीय पक्ष असू शकतो, परंतु संसद सुरळीत चालवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असंही ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करणार…
संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये समन्वय असला पाहिजे. पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. ऑपरेशन सिंदूरवरील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दाव्यांच्या मुद्द्यावर सरकार संसदेत योग्य उत्तर देईल, असंही रिजीजू म्हणाले.
रिजिजू म्हणाले की, लहान राजकीय पक्षांना, विशेषतः ज्यांचे १-२ खासदार आहेत, त्यांना त्यांच्या संख्येनुसार वेळ दिला जातो म्हणून बोलण्यासाठी कमी वेळ मिळतो. परंतु आम्ही त्याची दखल घेतली आहे. लहान पक्षांना पुरेसा वेळ देण्यास आम्ही सहमती दर्शविली आहे, असंही ते म्हणाले.