Rakesh Tikait : आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. 2014 मध्ये लोकसभा (Lok Sabha) आणि अनेक राज्यांच्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. तर पंतप्रधान मोदींना घेरण्यासाठी विरोधी पक्षांकडून मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठा दावा केला आहे. 2024 मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील. पण ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत, असं विधान टिकैत यांनी केलं. (PM Narendra Modi wants to be President; Sensational claim of farmer leader Rakesh Tikait)
राकेश टिकैत हे कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून सातत्याने कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून सरकारवर निशाणा साधत आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी शेतकरी आंदोलन तसेच 2024 च्या निवडणुकीवर मोकळेपणाने भाष्य केले. ते म्हणाले की 2024 मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील.
Radhakrishan Vikhe : दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; महसूलमंत्र्यांची ग्वाही
पण त्याचवेळी पंतप्रधान मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत आणि ते मधातच ते पायउतार, असं टिकैत म्हणाले. टिकैत यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी हे त्यांच्या कार्यकाळाच्या मध्यभागी हे पद सोडतील. त्यांना हटवणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले की, आम्ही त्यांना हटवणार नाही, पंतप्रधान मोदी स्वतः ते पद सोडतील कारण त्यांनाही देशाचे राष्ट्रपती व्हायचे आहे,असा दावा त्यांनी केला.
उत्तर प्रदेशातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०० हून अधिक जागा जिंकल्याचा दावा टिकैत यांनी केला. यावेळी देशाच्या पुढील पंतप्रधानपदासाठी आपली निवड उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना असेल, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनंतर कोण? या प्रश्नावर ते म्हणाले, योगी आदित्यनाथ. ते म्हणाले की, सीएम योगींना काम करू दिले जात नाही, असही ते म्हणाले.