Download App

PMGKAY : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदची बातमी! मोफत रेशन याजनेचा लाभ 5 वर्षापर्यंत वाढवला

  • Written By: Last Updated:

Free Ration Scheme: केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) गरिबांना मोफत रेशन (Free ration) देण्यात येत येते. या योजनेचा कालावाधी हा पुढील महिन्यात संपणार होता. मात्र, या योजनेला आणखी पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळं देशातील 81 कोटी गरीब जनतेला दिलासा मिळाला.

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या बोल्ड लुकने चाहते घायाळ… 

31 डिसेंबर 2028 पर्यंत मिळेल लाभ
मंत्रिमंडळ बैठकीची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो गहू किंवा तांदूळ दिला जातो. हे धान्य नागरिकांना मोफत दिलं जातं. कोरोना काळात 30 जून 2020 रोजी केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेकवेळा मुदत वाढविण्यात आली. ही योजना डिसेंबर 2023 मध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यात संपणार होती. मात्र, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. येत्या पाच वर्षांत या योजनेवर सुमारे 11.8 लाख कोटी रुपये खर्च केले जातील, असे ठाकूर म्हणाले.

‘मोदी महापुरुष, तर मंदिर बनवा’; पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपला उपरोधिक सल्ला 

घोषणा निवडणूक रॅलीत करण्यात आली

यामध्ये, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) 5 किलो अनुदानित खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 5 किलो मोफत अन्नधान्य दिले जाते. या योजनेला अनेक वेळा मुदतवाढ दिल्यानंतर, डिसेंबर 2022 मध्ये PMGKAY मोफत धान्य हमी योजना NFSA अंतर्गत आणण्यात आली. अलीकडेच छत्तीसगडमधील निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत अन्नधान्य योजनेबाबत पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची घोषणा केली होती.

36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांना फायदा
36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश NFSA अंतर्गत येतात. सरकारी अधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे वर्णन ‘देशातील वंचितांसाठी नवीन वर्षाची भेट’ असे केले आहे. लाभार्थ्यांना धान्यासाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. कोरोना महामारीच्या काळात 2020 मध्ये PMGKAY योजना सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या अंतर्गत, सरकार NFSA कोट्यातील व्यक्तींना 5 किलो धान्य मोफत पुरवते.

सध्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) लाभार्थ्यांना 1-3 रुपये प्रति किलो दराने अन्नधान्य दिले जाते. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दिले जाते. तर अंतोदय अन्न योजना (AAY) कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य दिले जाते.

follow us