Download App

PMJDY : मोदी सरकारला दणका! 49 कोटी खाते उघडले पण, चालू खात्यांची संख्या ‘इतकी’ घटली

PMJDY : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला 26 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त भाजप केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान चालवत आहे. या योजनांनमध्ये जनधन योजना (PMJDY) अत्यंत महत्वाची मानली जाते. मोदी जेव्हा 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले त्यावेळी 15 ऑगस्टला त्यांनी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर पंधरा दिवसांतच या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश सर्व लोकांना बँकेच्या सेवांशी जोडणे हा होता.

या योजनेत पहिल्या चार वर्षात साडेसात कोटी बँक खाते उघडण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांतच हे उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले. 17 मे 2023 रोजीच्या आकडेवारीनुसार 49.03 कोटी लोकांचे खाते उघडण्यात आले होते. 31 जानेवारी 2015 मधील आकडेवारीबरोबर तुलना केली तर चारपट जास्त खाते उघडण्यात आले आहेत.

या योजनेत कोट्यावधी लोक पहिल्यांदाच बँकिंग प्रणालीशी जोडले गेले. मोठ्या संख्येने खाते उघडले गेले तरी खाते निष्क्रिय होण्याचाही धोका होताच. कारण, प्रत्येक जण नियमितपणे खात्यात व्यवहार सुरू ठेवील याची शाश्वती नव्हती. 2016 मध्ये इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने माहिती अधिकारातून मिळालेली माहिती आणि स्वतः केलेल्या तपासणी आधारे एक अहवाल तयार करून छापला होता.

गेहलोत-पायलट वादात काँग्रेस पक्षश्रेष्ठींची यशस्वी मध्यस्थी; राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये मोठा निर्णय

या अहवालात असे म्हटले होते, की बँकांच्या मॅनेजर्सवर दबाव आणला गेला होता की त्यांनी त्यांच्या बँकांच्या शाखांमध्ये झिरो बॅलन्स खात्यांची संख्या कमी करावी. यावर असा तोडगा काढण्यात आला की बँकांनी त्यांच्यातर्फे अशा खात्यांमध्ये एक-एक रुपया जमा केला. आरटीआयच्या हवाल्याने असे सांगण्यात आले होते की 34 बँकांमध्ये 1.05 कोटी खाते असे होते ज्यामध्ये फक्त एक रुपया जमा होता. काही खात्यात दोन रुपये किंवा पाच रुपये जमा होते. 2021 मध्ये वित्त मंत्रालयाने सांगितले होते की त्यावर्षी 28 जुलैपर्यंत 5.82 कोटी खाते इनऑपरेटिव्ह झाले होते. यामध्ये 2.02 कोटी खाते महिलांचे होते.

आरबीआयच्या एका अहवालानुसार ऑगस्ट 2022 मध्ये 46.25 कोटी जनधन खात्यांपैकी 81.2 टक्के खाते चालू होते. 2017 मध्ये हा आकडा 76 टक्के होता. फक्त 8.2 टक्के खात्यांत झिरो बॅलन्स होता. रिजर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांनुसार दोन वर्षांपर्यंत जर एखाद्या खात्यात काही व्यवहार झाले नसतील तर त्या खात्याला निष्क्रिय मानले जाते. जनधन खात्यात जमा रक्कम आठ वर्षात साडेसात पटींनी वाढली आहे. ऑगस्ट 2015 मध्ये 22 हजार 901 कोटी रुपये जमा होते जे ऑगस्ट 2022 मध्ये 1 लाख 73 हजार 954 कोटी झाले.

Tags

follow us