नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत इलेक्टोरल बाँडचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत झालेली दुरावस्था जाहीरपणे सांगितली आहे. पक्षाची खाती गोठावण्यात आल्याने आमच्याकडे पोस्टर छापायलाही पैसे नसल्याचे सांगत निवडणुका कशा लढवणार? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी उपस्थित केला आहे. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला दुबळं बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींना पद्धतशीर प्लॅनिंग केल्याचा आरोपही सोनियां गांधींनी (Sonia Gandhi) यावेळी केला. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याची चर्चा खोटी असून, भारतातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे आज काँग्रेसकडे आपल्या नेत्यांच्या मदतीसाठी दोन रुपयेही नसल्याचे राहुल गांधींनी सांगितले. (Congress Leader Press Confarance Sonia Says PM’s systematic effort to cripple Congress )
#WATCH | Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi says, "…This issue affects not just Congress, it impacts our democracy itself most fundamentally. A systematic effort is underway by the Prime Minister to cripple the Indian National Congress financially. Funds… pic.twitter.com/HT4dSCuhpc
— ANI (@ANI) March 21, 2024
‘भारत लोकशाही, मूल्ये आणि आदर्शांसाठी जगभरात ओळखला जातो. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इलेक्टोरल बाँड्सचे सत्य बाहेर आले आहे. कोणत्याही लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणुका आवश्यक असतात. मात्र, इलेक्टोल बाँड्सच्या मुद्द्यानंतर भारताच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काँग्रेस पक्षाची खाती गोठावून निवडणूक लढवण्यासाठी अडथळे निर्माण करून धोकादायक खेळ खेळला गेल्याचे म्हणत सगळीकडे केवळ आणि केवळ भाजपच्या जाहिराती दिसून येत असल्याचे खरगे म्हणाले.
कारवाईच्या वेळेवरून राहुल गांधींनी उपस्थित केला प्रश्न
पत्रकार परिषदेत काँग्रेसवर करण्यात आलेल्या कारवाईच्या वेळेबाबत राहुल गांधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ते म्हणाले की, काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यात पक्षाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. एवढेच काय तर, पक्षाच्या नेत्यांना येण्याजाण्यासाठी विमान सोडा रेल्वे प्रवासाचे तिकीटही काढू शकत नसल्याचे ते म्हणाले. निवडणुकीच्या दोन महिने आधी ही कारवाई करण्यात आल्याने ही नियोजित कारवाई होती का? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. भारतातील 20% लोक आम्हाला मत देतात आणि या क्षणी साधे 2 रुपयेही कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना देऊ शकत नाहीये. ही सर्व ऐन निवणडुकांच्या तोंडावर काँग्रेसला दुबळं करण्यासाठीच रचण्यात आलेलं षडयंत्र असल्याचा थेट आरोपही राहुल यांनी मोदी सरकारवर केला.