राहुल अन् सोनिया गांधींच्या नादी लागू नका, आठवलेंचा शरद पवारांना सल्ला

राहुल अन् सोनिया गांधींच्या नादी लागू नका, आठवलेंचा शरद पवारांना सल्ला

शरद पवार एक हुशार राजकारणी आहेत, त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या नादी लागू नये, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिला आहे. दरम्यान, रामदास आठवले यांचा आज अहमदनगर दौरा होता. अहमदनगरमधून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळूतस्करांची दहशत ! अधिकारी, कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न

सध्या देशात विरोधी पक्षनेत्यांकडून सत्ताधारी सरकारविरोधात मोट बांधण्याचं काम सुरु आहे. देशातल्या सर्वच विरोधी पक्ष नेत्यांची नूकतीच पटणा इथं बैठक पार पडली. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, यांच्यासह देशातल्या इतर विरोधी पक्ष नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली होती. बैठकीतून अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली होती. या टीकेनंतर रामदास आठवलेंनी शरद पवारांना सल्ला दिला आहे.

Sujay Vikhe : पंकजा मुंडेंना ‘BRS’ ची ऑफर; विखे म्हणाले, मुंडे भाजपात…

देशात सर्वच घटकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चांगलं काम सुरु आहे. त्यांच्या कामाची स्तुती करण्याऐवजी शरद पवार नितीश कुमार, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या नादी लागून टीका करीत असल्याचं ते म्हणाले आहेत.

एसटी बॅंकेवर झेंडा फडकावताच सदावर्तेंकडून नथुराम गोडसेंच्या समर्थनात घोषणा…

यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील इतर घडामोडींवरही सडेतोडपणे भाष्य केलं आहे. सध्या राज्यात भावी मुख्यमंत्रिपदाच्या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने भावी मुख्यमंत्री या मजकूराचे बॅनर लावल्याचे प्रकार दिसून आले आहेत. त्यावर मला बॅनरबाजीचा मुख्यमंत्री व्हायची इच्छा नसल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

एकीकडे राज्यात धार्मिकतेवरुन दंगलीचं वातावरण पेटलेलं आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर जात फुलं वाहत आहेत. त्यांची ही कृती दलित समाजाला आवडलेली नसल्याचं म्हणत त्यांनी आंबेडकरांच्या कृतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं दिसून आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube