मोठी बातमी! पंतप्रधान निवास्थानासमोरून आंदोलन करताना राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने देशभरात वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Photo   2026 07 21T195914.473

मोठी बातमी! पंतप्रधान निवास्थानासमोरून आंदोलन करताना राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. (Police)  काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं गेल्या तीन तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आता आंदोलनस्थळी पोलीस पोहोचले असून, समोर आलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने देशभरात वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जंतरमंतरवरील आंदोलक करत आहेत. आता राहुल गांधी थेट आंदोलनात उतरल्याने देशभरात अनेक ठिकाणी संतप्त वातावरण निर्माण झालं आहे. काल दिल्लीत लोकसभेला विद्यार्थ्यांनी घेराव घातला. या मोर्चात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. आजही जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरूच आहे.

गृहमंत्र्यांसह मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरुन राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

आता दुसरीकडे काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तब्बल तीन तासांपासून हे आंदोलन सुरू असून, राहुल गांधी यांनी सरकारकडे पाच मागण्या केल्या आहेत. दरम्यान आता आंदोलन स्थळी पोलीस पोहोचले असून, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधी यांच्या आंदोलनाची दखल घेत मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी जितेंद्र सिंह यांच्यासमोर पाच मागण्या ठेवल्या आहेत.

ज्यामध्ये सर्वात मोठी मागणी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी संसदेत निवेदन द्यावे, नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या राहुल गांधी यांनी केल्या आहेत. दरम्यान राहुल गांधी यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यानंतर आता राहुल गांधी आणि प्रियकां गांंधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Exit mobile version