दिल्लीत नमाज पढणाऱ्या व्यक्तीला लाथ मारली, पोलीस कर्मचारी निलंबित

Delhi Police : दिल्लीतील इंद्रलोक येथील एक व्हिडिओ व्हायरल (Delhi Viral Video) झाला आहे. इंद्रलोक परिसरात रस्त्यावर शुक्रवारची नमाज अदा सुरू होती. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने (Delhi Police) त्यांचीशी गैरवर्तन केले. नमाज अदा करणाऱ्या तरुणांना पोलीस कर्मचाऱ्याने लाथा मारल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. […]

Delhi Viral Video

Delhi Viral Video

Delhi Police : दिल्लीतील इंद्रलोक येथील एक व्हिडिओ व्हायरल (Delhi Viral Video) झाला आहे. इंद्रलोक परिसरात रस्त्यावर शुक्रवारची नमाज अदा सुरू होती. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने (Delhi Police) त्यांचीशी गैरवर्तन केले. नमाज अदा करणाऱ्या तरुणांना पोलीस कर्मचाऱ्याने लाथा मारल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस कर्मचाऱ्याच्या या कृत्यानंतर घटनास्थळी उपस्थित काही लोक संतप्त झाले आणि गोंधळ सुरू झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलीस कर्मचाऱ्याला घेराव घातला होता. दिल्ली पोलिसांनी त्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

नमाज पढणाऱ्यांना पोलिसांनी लाथ मारली
या प्रकरणी डीसीपी मनोज मीणा म्हणाले की, तपास गांभीर्याने केला जात आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर आणखी काही कठोर पावले उचलली जातील.
काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही! वायनाडमधून राहुल गांधींचे नाव फायनल; पाहा संपूर्ण लिस्ट

काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांनी हा व्हिडिओ X वर शेअर करून दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रतापगढ़ी यांनी लिहिले की, “नमाज अदा करताना एका व्यक्तीला लाथ मारणाऱ्या या दिल्ली पोलिस शिपायाला कदाचित मानवतेची मूलभूत तत्त्वेच समजत नाहीत. या पोलीसाच्या मनात काय द्वेष भरला आहे, दिल्ली पोलिसांना विनंती आहे की या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी. त्याच्यावर योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करा आणि त्याची सेवा समाप्त करा, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version