‘ठाकरेंनी घरी बसून केलं, तुम्ही बोंबलत फिरुनही नाही’; ठाकरेंचा शिलेदार मैदानात
Omraje Nimbalkar News : कोरोना काळात उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी घरी बसून जे करुन दाखवलं, ते सत्ताधाऱ्यांना बोंबलत फिरुनही नाही जमलं, अशी सडकून टीका धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जनसंवाद जाहीर सभांचं आयोजन करण्यात येत आहे. धाराशिवमधील भूममध्ये आज जाहीर सभा पार पडली. या सभेत ओमराजे निंबाळकर बोलत होते.
देवधरांचं त्रिपुरात मोठं कार्य, पुण्याला असाच लोकप्रतिनिधी हवा; लोकसभेच्या रेसमध्ये देवधरांचीच चर्चा
ओमराजे निंबाळकर म्हणाले, कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी घरी बसून जे करुन दाखवलं आहे ते सत्ताधाऱ्यांना बोंबलत फिरुनही नाही जमलं. कोरोना काळात आत्ताचा मुख्यमंत्री असता तर स्टेजच्या पुढचे अन् मागचे दिसले नसते, अशी जहरी टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
Bhumi Pedanekar : भक्षकच्या यशाचं क्रेडिट देत माध्यामांना, भूमीचं पत्रकारांना ट्रिब्यूट!
शिवरायांच्या काळात ज्यांनी गद्दारी केली, त्यांची नावे गद्दारांच्या यादीतच घेतली जात आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी झालेला गद्दारीचा साडेतीनशे वर्षानंतरही पुसला जाऊ शकत नसेल तर गद्दार होण्यापेक्षा खुद्दार होणं चांगलं आहे. बाळासाहेबांनी सांगितलं की 20 राजकारण आणि 80 टक्के समाजकारण त्या मार्गाने आम्ही चालत आहोत.
एकाही माणसाने सांगावं की कधी मी फोन उचलला नाही जरी फोन नाही उचलला तरी पुन्हा माघारी फोन करतो अजिबात एकही फोन राहिलेला नाही पण काही पैशांची मस्ती आलेले लोकं म्हणतात की, फोन उचलून काय होतं कोणीही कोणत्याही अडचणीत असतो त्यासाठीच फोन करत असतो म्हणूनच मी फोन उचलतो. शुल्लक कामांसाठीही लोकं फोन करत असतात. कोणतीही अडचण आली तरीही माझा खासदार ती अडचण सोडवतो हा विश्वास मी निर्माण केलायं, असंही निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारवरही पीकाच्या भावावरुन सडकून टीका केली आहे. सोयाबीनचा भाव 11 हजारांवरुन 5 हजार झाला आहे ही आहे मोदींची गॅरंटी? असा सवाल निंबाळकर यांनी केली आहे. तसेच एका क्विंंटलला सहा हजार रुपयांचं नूकसान आहे. कांदा दूधाचा भाव कमी झालायं आधी किती होता आता किती झाला ही आहे मोदींची गॅरंटी असं म्हणत ओमराजे निंबाळकरांनी मोदींची नक्कल करत खिल्ली उडवली आहे.