Download App

MP Election : मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का, सिंधिया समर्थकांचा राजीनामा

MP BJP Leaders Resignation:मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदूरमध्ये भाजप नेते दिनेश मल्हार आणि प्रमोद टंडन यांनी त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. इंदूरचे नेते प्रमोद टंडन हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र आता त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने पक्षासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.

प्रमोद टंडन याआधी काँग्रेसमध्ये होते आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी सोमवारी सायंकाळी त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला. त्यामुळे राऊ विधानसभेत भाजपची अडचण झाली आहे.

तामिळनाडूत भाजपाला मोठा धक्का, AIADMK ने केली युती तोडण्याची घोषणा

याशिवाय प्रमोद टंडन यांच्यासह दिनेश मल्हार यांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या आधी ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक असलेले समंदरसिंग पटेल यांनीही भाजप सोडला आहे. प्रमोद टंडन आणि दिनेश मल्हार हे दोघेही 23 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असे मानले जात आहे. या दिवशी इंदूरमध्ये कमलनाथ यांचा कार्यक्रमही आहे, त्यादरम्यान दोन्ही नेते पक्षाचे सदस्यत्व घेऊ शकतात.

IND vs AUS: टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटला विश्रांती; अश्विनचे ​​पुनरागमन

भाजपचा राजीनामा देण्याचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार 8 जून 2020 रोजी प्रमोद टंडन यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. शिवराज सिंह चौहान यांनीही प्रमोद टंडन यांचे स्वागत केले होते. या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्यावर इंदूर शहर भाजप अध्यक्षांचे म्हणणे आहे की, नेत्यांनी राजीनामा का दिला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. राजीनाम्यानंतर प्रमोद टंडन म्हणाले की, पक्ष सोडण्यामागे काहीतरी कारण असले पाहिजे, कोणीही असेच बेवफाई करत नाही.

Tags

follow us