Pooja Khedkar : यूपीएससीने प्रशिक्षणार्थी IAS पद काढून घेलत्यानंतर पूजा खेडकर (Pooja Khedkar) नॉट रिचेबल झाल्यात आहेत. नवी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) तिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईला (Dubai) पळून गेल्याचे वृत्त आहे. मात्र, पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर भारतात आहे.
Paris Olympics 2024 : दीपिका कुमारीने केली कमाल, तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक
बनावट प्रमाणपत्राच्या आधारे आयएएस पद मिळवल्याप्रकरणी पूजा खेडकरच्या विरुद्ध केंद्रीय लोकसेवा आयोगाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर अटक होऊ नये, यासाठी तिने दिल्लीतील पटियाला हाऊस या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर गुरूवारी सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळं पूजाला केव्हाही अटक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा देशातून परदेशात पसार झाली असावी, अशी शक्यता अनेक वृत्तपत्रांमध्ये व्यक्त केली जात आहे. ती दुबईला गेल्याची मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र, पोलिसांच्या तपासात पूजा खेडकर भारतात असल्याची माहिती आहे.
रिलीज होताच ‘किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स’ ऑनलाईन लीक, निर्मात्यांचं नुकसान
दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरची संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकार, एम्स आणि मसुरी केंद्राकडून मागवली आहे. पूजाने सादर केलेली कागदपत्रेही मागवण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिस पूजाला चौकशीसाठी बोलावतील.
12 वेळा केला नावात बदल
इतर मागासवर्गीय प्रवर्गातून यूपीएससीची 9 वेळा बसण्याची परवानगी आहे. मात्र पूजा खेडकरने सहा वेळा नाव बदलून 12 वेळा परीक्षेला बसल्याचे समोर आले आहे. UPSC फॉर्म भरतानाही स्वत:च्या नावाचे स्पेलिंग अनेक वेळा बदलले आहे. कधी वडिलांच्या नावात तर कधी आईच्या नावात बदल करून फॉर्म भरला आहे. दिल्ली पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.