अटकपूर्व जामीन फेटाळताच पूजा खेडकर दुबईला पसार?, अटकेच्या भीतीने फरार झाल्याची चर्चा
Pooja Khedkar: युपीएससीने आयएएस (IAS) पद काढून घेलत्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयाने पूजा खेडकरचा (Pooja Khedkar) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court Delhi) हा निर्णय दिला. त्यामुळे आता पूजा खेडकरला ((Pooja Khedkar) कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. दरम्यान, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे.
Rockstar DSP : संगीतकार रॉकस्टार डीएसपी प्रत्येक दिग्दर्शकाचा आवडता? जाणून घ्या कारण…
बनावट प्रमाणपत्राच्या आधारे आयएएस पद मिळवल्याप्रकरणी पूजा खेडकरच्या विरुद्ध केंद्रीय लोकसेवा आयोगाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर अटक होऊ नये, यासाठी तिने दिल्लीतील पटियाला हाऊस या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर गुरूवारी सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळं पूजाला केव्हाही अटक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा देशातून परदेशात पसार झाली असावी, अशी शक्यता अनेक वृत्तपत्रांमध्ये व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लोकसभेला गडबड केली विधानसभेला नको, फक्त आशीर्वाद द्या; अजितदादांनी काय सांगितलं?
दिल्लीत एका नेत्याच्या घरी मुक्काम?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा या काळात दिल्लीतील बड्या नेत्याच्या घरी मुक्कामी होती. अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल, याची कुणकुण लागताच ती दुबईला पसार झाल्याचे कळते.
पूजा खेडकर दहा दिवसांपासून नॉट रिचेबल
बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएएस पद मिळवल्याचा आरोप पूजा खेडकरवर आहे. पूजा खेडकर गेल्या दहा दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. मसुरीच्या आयएएस प्रशिक्षण संस्थेने तिला परत बोलावलं. मात्र, ती हजर झालेली नाही. पूजा सध्या कुठं आहे, याचा ठावठिकाणा लागत नाही.
पूजाचा आणखी एक कारनामा…
पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकरने 12 वेळा नाव स्वत:च्या नावात फेरफार करून परीक्षा दिल्याचं तपासात समोर आले आहे. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना दिल्ली पोलिसांनी ही माहिती न्यायालयाला दिली आहे