लोकसभेला गडबड केली विधानसभेला नको, फक्त आशीर्वाद द्या; अजितदादांनी काय सांगितलं?

लोकसभेला गडबड केली विधानसभेला नको, फक्त आशीर्वाद द्या; अजितदादांनी काय सांगितलं?

Ajit Pawar Speech in Nashik : ‘आम्ही काम करणारी माणसं आहोत. महायुतीचंच सरकार काम करू शकतं. बाकीचे लोक फक्त आंदोलन करू शकतात. तेव्हा अफवांवर विश्वास ठेऊ नका. मागे लोकसभेला असंच झालं. आरक्षण जाणार, संविधान बदलणार अशा खोट्या अफवा पसरवल्या गेल्या मी सांगत होतो असं काही होणार नाही तरी त्यावर तुम्ही विश्वास ठेवला. आता लोकसभेला गडबड केली तशी विधानसभेला करू नका. निवडणुकीत आशीर्वाद द्या. माझ्या विचारांची माणसं निवडून द्या. सरकारच्या योजना अशाच वर्षानुवर्षे सुरू राहतील, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे आज विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी दमदार भाषण करत विरोधकांवर घणाघाती टीका केली. या मेळाव्यासाठी आमदार नरहरी झिरवाळ, नितीन पाटील यांच्यासह पक्षातील नेते पदाधिकारी उपस्थित होते. छगन भुजबळांची गैरहजेरी मात्र प्रकर्षाने जाणवत होती.

निवडणुकीत आशीर्वाद द्या, योजना सुरुच राहतील

अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही जुलैपासून माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. कागदपत्र गोळा करण्याचं काम सुरू आहे. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होऊन ऑगस्टमध्ये पात्र ठरला तर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होतील. पैसे तुमच्याच खात्यात येणार आहेत त्यामुळे त्या पैशांचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा. गरीबांची दुःख आम्हालाही माहिती आहेत. त्यासाठीच आम्ही ही योजना आणली. आता विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय. पण त्याकडे लक्ष देऊ नका.

“..तर मी राजकारणातून संन्यास घेईन”; संतापाच्या भरात अजितदादांचं कुणाला चॅलेंज

आम्ही फक्त महिलाच नाही तर समाजातील अन्य घटकांचाही विचार केला आहे. शेतकऱ्यांना वीजमाफी दिली. मागचं बिल कुणी मागायला आला तर त्याला माझं नाव सांगा. मी शब्दाचा पक्का, शब्द फिरवत नाही. खूप विचार करू  शब्द देतो एकदा शब्द दिला तर कोणत्याही परिस्थितीत मागे फिरत नाही. युवकांसाठी स्टायपेंड योजना सुरू केली. दहा लाख मुलामुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी सरकार दहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. तीन गॅस सिलिंडरचे पैसे थेट खात्यात देणार आहोत. आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार आहे.

मी शब्दाचा पक्का, दिलेला शब्द पाळतोच

विचार करूनच आम्ही योजना आणल्या आहेत. बाकीच्या घटकांसाठी सुद्धा योजना आणल्या. पोलीस पाटील, कोतवालांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. मी सरकारमध्ये नसतो तर या योजना तुम्हाला देता आल्या असत्या का तर नाही. विरोधक आमच्यावर राज्य दिवाळखोरीत निघेल अशी टीका करतात. पण आम्हालाही व्यवहार कळतो. मी पहिल्यांदा मंत्री झालेलो नाही. 35 वर्षांपासून मी विविध पदं सांभाळतोय. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. निवडणुकीत फक्त आशीर्वाद द्या माझ्या विचारांची लोकं निवडून द्या या योजना अशाच सुरू राहतील, असा शब्द अजित पवार यांनी यावेळी दिला.

“ज्याचा आमदार त्याचीच जागा”; निवडणुकीसाठी अजितदादांचा अजेंडा क्लिअर

बाकीची लोकं फक्त आंदोलनं करतात

काम आम्हीच करू शकतो दुसरे फक्त आंदोलन करू शकतात. बाकी काहीच करू शकत नाही. त्यांची हिस्ट्री काढा. पहा किती कामं केली त्यांनी. मागं लोकसभेला असंच सांगितलं की आरक्षण काढणार. घटना बदलणार.. हे धादांत खोटं होतं पण तुम्हीही विश्वास ठेवला. आता काय दिसतं. लोकसभेला गडबड केली ती आता विधानसभेला करू नका. तुम्हाला योजना पाहिजे असतील तर महायुतीचा विचार करा असेही अजित पवार म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube