“ज्याचा आमदार त्याचीच जागा”; निवडणुकीसाठी अजितदादांचा अजेंडा क्लिअर

“ज्याचा आमदार त्याचीच जागा”; निवडणुकीसाठी अजितदादांचा अजेंडा क्लिअर

Ajit Pawar on Maharashtra Elections : राज्यात आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मतदारसंघांची चाचपणी आणि जागावाटपाच्या (Maharashtra Elections 2024) चर्चा सुरू होणार आहेत. महायुतीत स्पर्धा वाढली आहे. मतदारसंघांवर दावेदारी सुरू झाली आहे. जागावाटपाचा निर्णय झालेला नसताना असं दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. घटकपक्षांना किती जागा मिळणार? जागांची अदलाबदल होणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला मिळाली पाहिजे अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.

अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार आहे याचेही संकेत त्यांनी दिले. अजित पवार म्हणाले, राज्यात एका पक्षाचं सरकार येणं अशक्य आहे. विकास आणि समान कार्यक्रमांवर आम्ही लक्ष देतो. विद्यमान जागा ज्या पक्षाची त्यालाच ती जागा मिळणार. मात्र विशिष्ट सिंटिंग जागांची अदलाबदल शक्य असेल.

..तर मी राजकारणातून संन्यास घेईन.. संतापाच्या भरात अजितदादांचं कुणाला चॅलेंज

आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडू

मी वेष बदलून दिल्लीला जात होतो हे साफ खोटं आहे. कुणीही काहीही बडबडतं त्यांना लाज वाटली पाहिजे. मी जिथे जातो तिथे नेहमीच उजळ माथ्याने जातो. मी कधीच नाव बदलून प्रवास केलेला नाही. विरोधकांकडून आता पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं जात आहे. वेष बदलून दिल्लीला गेल्याचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकाराणातून संन्यास घेईन, असे उत्तर अजितदादांनी दिले.

नेमकं काय घडलं ?

अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याआधी अनेकदा दिल्लीला गेले होते. येथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर बैठका घेतल्या होत्या. या बैठकीसाठी अजित पवार मास्क आणि टोपी घालून हजर राहत होते असा खुलासा अजितदादांनीच काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. वेष बदलून प्रवास, नावात बदल करून प्रवास केला असे आरोप विरोधी पक्षांनी केले होते. अशा पद्धतीने एखादा दहशतवादी आला तर काय, विमानतळांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती.

Ajit Pawar : ‘धाकल्या’ पवारांची झाकली मूठ सव्वा लाखाची अखेर उघडी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube