Download App

Poonch IAF Convoy Attack : बदला घेणारचं! संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी

या हल्ल्यामागील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली असून, परिसरातील वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Poonch IAF Convoy Attack Security Forces Released Sketches Of Two Suspected Terrorists : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर शनिवारी (दि.4) दहशवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद तर, चार जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता या हल्लेखोरांचा भारतीय लष्कराकडून कसून शोध घेतला जात असून, या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे सुरक्षा दलाकडून जारी करण्यात आली आहेत.

Video : भर सभेत मोदीजी म्हणाले, ”शिंदेजी तुम्हारा आवाज बैठ रहा है!” शिंदेंच्या विधानाने मेळाव्यात हशा

माहिती देणाऱ्यास 20 लाखांचे बक्षीस

दहशतवाद्यांबाबत माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे रोख बक्षीसही सैन्याने जाहीर केले आहे. या हल्ल्यामागील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली असून, परिसरातील वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

साहेब, तुम्ही तब्बेत जपा, आता आम्ही खिंड लढवतो..! शरद पवारांसाठी बीडच्या शिलेदाराचे भावूक उद्गार

चौकशीसाठी 20 हून अधिक लोक ताब्यात

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर जम्मू-काश्मीर मधील पूंछ जिल्ह्यात करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद तर, चार जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले असून, लष्कराकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीासाठी पोलिसांनी आतापर्यंत 20 हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वायुसेनेच्या ताफ्यावर करण्यात आलेला हा हल्ला या वर्षातील पहिली मोठी घटना असून, गेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी बुफलियाजमध्ये सैन्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा गट पूंछमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यामागे सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नुसतं बाळासाहेब म्हणू नका, हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरते का? ठाकरेंची PM मोदींवर हल्लाबोल

मतदानापूर्वी हल्ला

अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या तीन आठवडे आधी हा हल्ला झाला. पुंछ हा अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघाचा एक भागअसून, येथे 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. 2022 मध्ये, राजौरी जिल्ह्यातील दारहाल भागातील परगल येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. त्यावेळी  या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नानी पाठवले होते.

follow us

वेब स्टोरीज