राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान 9 मिनिटे ‘बत्ती गुल’; अंधारातच केलं भाषण

President Draupadi Murmu on Odisha : ओडिशामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान वीज खंडीत झाल्याचे समोर आले आहे. महाराजा श्री रामचंद्र भांजदेव विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती संबोधित करत होत्या त्यावेळी वीज गेली. त्यानंतर राष्ट्रपतींनी अंधारात भाषण सुरू ठेवले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज खंडित झाल्याच्या घटनेवर सर्व स्तरावरुन टिका […]

Untitled Design (1)

Untitled Design (1)

President Draupadi Murmu on Odisha : ओडिशामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान वीज खंडीत झाल्याचे समोर आले आहे. महाराजा श्री रामचंद्र भांजदेव विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती संबोधित करत होत्या त्यावेळी वीज गेली. त्यानंतर राष्ट्रपतींनी अंधारात भाषण सुरू ठेवले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज खंडित झाल्याच्या घटनेवर सर्व स्तरावरुन टिका केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी सकाळी 11.56 ते दुपारी 12.05 वाजेपर्यंत नऊ मिनिटे वीज खंडित झाली होती. वीज नसल्याने संपूर्ण सभागृहात अंधार होता. मात्र, या अंधारातही राष्ट्रपतींनी आपले अभिभाषण सुरूच ठेवले.

मिळालेल्या माहितीनुसार, वीज गेल्यानंतरही द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करणे थांबवले नाही. ते हसत हसत म्हणाल्या की आजचा हा कार्यक्रम बघून विजेलाही आमचा हेवा वाटू लागला आहे. आपण अंधारात बसलो आहोत पण अंधार आणि प्रकाश दोन्ही बरोबरीने घेऊ.

Pakistan : मोस्ट वाँटेड खलिस्तानी परमजीत सिंग पंजवाडची पाकिस्तानमध्ये हत्या

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने वीज विभागाने आपल्या चुकीबद्दल खेद व्यक्त केला आहे. माहिती व जनसंपर्क विभागानेही चूक मान्य केली आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती प्रोफेसर गणेशी लाल, मंत्री प्रदीप कुमार अमत आणि कुलगुरू संतोष त्रिपाठीही उपस्थित होते.

ब्रिटनच्या किंग चार्ल्स III चा राज्याभिषेक: हजारो कोटींचा खर्च, पाहा फोटो

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातही वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेचा सर्वचं क्षेत्रातून निषेध केला जात आहे. या घटनेनंतर मयूरभंज जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. तपासासाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे.

Exit mobile version