Pakistan : मोस्ट वाँटेड खलिस्तानी परमजीत सिंग पंजवाडची पाकिस्तानमध्ये हत्या
Pakistan : दहशतवादी आणि खलिस्तान कमांडो फोर्स (KCF) प्रमुख परमजीत सिंग पंजवाड (Paramjit Singh Panjwad)उर्फ मलिक सरदार सिंग याची आज शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरमधील (Lahore) जौहर टाऊनमध्ये गोळ्या घातल्या आहेत. ही घटना जोहर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीतील पंजवाड यांच्या घराजवळ सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
ब्रिटनच्या किंग चार्ल्स III चा राज्याभिषेक: हजारो कोटींचा खर्च, पाहा फोटो
पजवाड हा खलिस्तान कमांडो फोर्सचा म्होरक्या होता. त्यानं पाकिस्तानमधून दहशतवादी कारवाया सुरु ठेवल्या होत्या. 1990 साली तो भारतातून पळून पाकिस्तानमध्ये लपून बसला होता. लाहोरच्या जोहर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीमध्ये अज्ञात दुचाकीस्वारांनी घुसून परमजीत सिंग पंजवाड यांच्यावर गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
पजवाड हा मलिक सरदार सिंग हे नाव वापरुन लाहोरमध्ये राहात होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सहा वाजता हल्लेखोर दुचाकीवरुन सोसायटीत घुसले होते. हल्लेखोरांनी परमजीत सिंग पंजवाड याच्यावर हल्ला करुन फरार झाले.
30 जून 1999 रोजी पंजवाडनं पासपोर्ट कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट घडवला होता. त्यात चारजण जखमी झाले होते. तर अनेक गाड्यांचं नुकसान झालं होतं. त्यावेळी एका स्कूटरमध्ये बॉम्ब लपवून ठेवला होता. त्यानंतर पोलिसांनी पानिपतमधून स्कूटरच्या मालकाला अटक करुन चौकशी केली होती.
परमजीत सिंग पंजवाड हा भारतातील पंजाबमध्ये ड्रोनद्वारे अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीत करत होता. पंजवाड गावात परमजीतचा जन्म झाला. परमजीतला कट्टरपंथी बनवण्यात त्याचा चुलत भाऊ लाभ सिंग याचा मोठा हात असल्याचं म्हटलं जातं.
परमजीत सुरुवातीला एका बँकेत काम करत होता. नंतर तो पंजाबमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्याने दहशतवादी संघटना खलिस्तानी कमांडो फोर्सची स्थापना केली. भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयानं 2020 मध्ये दहशतवाद्यांची यादी जाहीर केली. त्यात परमजीत सिंग पंजवाडचं नाव होतं. 1990 मध्ये भारतीय सुरक्षा दलांचा घाबरून त्यानं पाकिस्तानात पळाला होता.