Pranit More Sejal Pawar Video : आम्ही मृतदेहाचे लिंग..,; प्रणितच्या शोमध्ये महिला डॉक्टर बरळली, नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली!

प्रणित मोरेच्या कार्यक्रमातील वादग्रस्त व्हिडीओ चर्चेत असतानाच एका महिला डॉक्टरचा याच शोमधील जुना व्हिडीओही चर्चेत आला आहे.

sejal pawar

sejal pawar

Pranit More Sejal Pawar Video : स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) याचा कॉमेडी शो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय राहिलायं. या कॉमेडी शोमध्ये प्रेक्षक संवाद साधताना आपले अनुभव शेअर करीत असतात. सध्या या कॉमेडी शोमधील एका तरुण डॉक्टरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओतील संवादावरुन नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. एका तरुण महिला डॉक्टर मृतदेहाच्या गुप्तांगाबद्दल अश्लिल विधाने करताना दिसून येत आहे. या संवादावरुन कॉमेडियन प्रणित आणि महिलेवर सडकून टीका केली जात आहे.

सेजल पवार (Sejal Pawar) असं या तरुण महिलेचं नाव असून या महिलेने वैद्यकीय क्षेत्रातील आपले अनुभव शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सेजल पवारने जे मृतदेह त्यांच्या रुग्णालयामध्ये आणतात. त्या मृतदेहांच्या लिंगाच्या आकारावरुन मित्र-मैत्रीणी थट्टा मस्करी करत असल्याचा सांगितलं आहे. या अश्लिल संवादावरुन सोशल मीडियावर कॉमेडियन प्रणित मोरेला आणि महिला डॉक्टर सेजल पवार यांना नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलंय.

या संपूर्ण घडामोडीनंतर समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी एकच सूर उमटताना दिसून येत आहे. मुली मृत व्यक्तीबद्दलची लैंगिक आणि अश्लिल विधाने करतात ही गोष्ट योग्य आहे का? समाज अशा प्रकारे दुजाभाव का करतो? या शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे एका मेडिकलच्या विद्यार्थ्याने त्याचा अनुभव शेअर करताना म्हटले की, मृतदेहावरुन विनोद करणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे हे मी सांगू शकतो. मला आजही अॅनटॉमीच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर डॉ. बी. डी. चौरसीया यांनी लिहिलेली कविता आठवते ज्यामध्ये मला प्रेमाने आणि काळजीपूर्वक हाताळा अशी विनंती पार्थिव करताना दाखवण्यात आलं आहे, अशी पोस्ट शेअर केलीयं.

दरम्यान, मृतदेहाची थट्टा करण्याच्या मुद्द्यावरुन सध्या सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे. मृतदेहाची थट्टा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या वादानंतर डॉक्टर सेजल पवार हिने आपलं इंस्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे. या वादात एखाद्या पुरुष डॉक्टरने याबाबत भाष्य केलं असते तर त्याला नोकरी गमवावी लागली असते. एवढंच नाही तर त्याचा परवानाही धोक्यात आला असता, यावरुन तुमचं मत सांगा, असा थेट सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.

प्रणित मोरेच्या स्टॅण्डअप कॉमेडी शोदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधताना गुरुग्राममधील हिमांशु जांगराने तो एका तरुणीसोबत डेट म्हणून जेवायला गेला होता असं सांगितलं. जेवणानंतर तिने त्याला मला घरी ड्रॉप कर अशी विनंती केली असता, ‘मला ते ऐकून आश्चर्य वाटलं,’ असं हिमांशु म्हणाला. पुढे बोलताना हिमांशुने, “तिला मी 370 रुपयाची बिर्णायी खाऊ घातली आहे तर माझ्या गुंतवणुकीचा परतावा तर मला मिळायला हवा ना? मी तिला म्हणाले, “370 रुपये खर्च केले आहेत तर ते वसूल तर करणारच” असं म्हटलं. पुढे त्याने तो तिच्यासोबत कशापद्धतीने अंगलट करु लागला हे सांगितलं. “मी तिचा टॉप वर केला लेगिन्समध्ये हात टाकला”, असं विधानही हिमांशुने केलं.

Exit mobile version