Download App

G20 Summit: G20 परिषदेची मोदींच्या भाषणाने समाप्ती, या परिषदेतून भारतानं काय मिळवलं?

  • Written By: Last Updated:

G20 Summit: कालपासून राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू होती. या परिषदेत जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याहस अनेक जागतिक नेते सहभागी झाले होते. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)या बैठकीचा  समारोप केला. याशिवाय, भारताकडे नोव्हेंबर 2023 पर्यंत G20 चे अध्यक्षपद आहे. त्यानंतर हे अध्यक्षपद ब्राझीलकडे सोपवले जाईल, असं सांगितलं.

G20 च्या परिषदेच्या समारोपप्रसंगी बोलतांना मोदी म्हणाले, नोव्हेंबरपर्यंत G20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. यासाठी अजून अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसांत आपण सर्वांनी अनेक सूचना आणि प्रस्ताव दिले आहेत. आलेल्या सूचनांवर आमच्याकडून विचार करण्यात येईल, ही आमची जबाबदारी आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस G20 चं एक व्हर्चुअल सेशन ठेवलं जाईल. या सेशमध्ये दोन दिवसीय शिबिरात झालेल्या मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे. आम्ही आशा करतो की तुम्ही या व्हर्चुअल सत्रांमध्ये सहभागी व्हाल. यासह, मी G20 शिखर परिषदेचा समारोप घोषित करतो.

ब्राझीलच्या राष्ट्रपतींना जी-20 अध्यक्षपदाचा मानचिन्ह सुपूर्द करताना नरेंद्र मोदी म्हणाले, ब्राझीलचे राष्ट्रपती आणि माझे मित्र लुला दा सिल्वा यांचे अभिनंदन. म्हणजेच नोव्हेंबर 2023 नंतर ब्राझील G20 चे अध्यक्षपद स्वीकारेल.

G20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लुला दा सिल्वा म्हणाले की, G20 परिषदेचे कार्यक्षमेतने नेतृत्व केल्याबद्दल आणि या शिखर परिषदेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल मोदींचे आभार. आता ही जबाबदारी ब्राझीलवर आहे. सामाजिक समावेश – भुकेविरुद्ध लढा, ऊर्जा संक्रमण – शाश्वत विकास आणि जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणणे हे ब्राझीलचे उद्दीष्ट आहे.

‘मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं होतं’; आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ

G20 परिषदेतून भारताने काय साधलं?

काल पहिल्या दिवशी भारताला मोठे यश मिळाले. या परिषदेच्या व्यासपीठावरून ऐतिहासिक भारत-मध्य-पूर्व-युरोप कनेक्टिव्हिटी इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली. त्यामुळं युरोपमध्ये व्यापार करण्याचा मार्ग खुला झाला आहे. दुसरं म्हणजे, आफ्रिकन युनियनला जी-20मध्ये सहभागी करून घेतलं. त्यामुळं भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी वजन वाढल आहे.

Tags

follow us