Priyanka Gandhi files nomination for Wayanad Lok Sabha :काँग्रेस राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी आज बुधवार (दि. 23 ऑक्टोबर) रोजी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका यांनी रोड शो केला. या रोड शोमध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रियंका गांधी यांच्या विरोधात भाजपने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे.
वायनाडमध्ये आज घमासान! प्रियंका गांधी अर्ज भरणार; काँग्रेस करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
मला राजकीय प्रचाराचा ३५ वर्षांचा अनुभव आहे. मी वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी, भाऊ राहुल गांधी आणि पक्षातील इतर सहकाऱ्यांसाठी प्रचार केला आहे. 1989 मध्ये 17 वर्षांची असताना राजकीय प्रचारात भाग घेण्यास सुरुवात केल्याचा दावा प्रियंका गांधी यांनी यावेळी केला आहे. त्या उमेदवारी अर्ज दाखलं केल्यानंतर आयोजीत सभेत बोलत होत्या.
प्रियांका सक्रिय राजकारणात
निवडणूक आयोगाने वायनाड पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेसने वायनाडमधून एआयसीसी सरचिटणीस यांना उमेदवारी दिल्यानंतर, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात पोस्टर लावले होते, ज्यावर “वायनाडित प्रियंकर (वायनाडचे प्रिय)” असे लिहिले होते. गेल्या आठवड्यात, निवडणूक आयोगाने वायनाड लोकसभा जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आणि यासह, केरळ मतदारसंघातून प्रियांका गांधी यांच्या निवडणूक पदार्पणासाठी मंच तयार झाला आहे, जिथून त्या सक्रिय राजकारणात सामील होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
प्रियंका यांच्या विरोधात कोण
दुसरीकडे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर राहुल गांधींनी अमेठी राखण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वायनाडची जागा रिक्त झाली असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांच्या विरोधात नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या नव्या यांनी 2007 मध्ये बी.टेक पूर्ण केले. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार, ती कोझिकोड कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवक आहे आणि भाजप महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस म्हणून पक्षासाठी काम करते.
LoP Shri @RahulGandhi & Congress General Secretary Smt. @priyankagandhi ji received a rapturous welcome in Kalpetta today.
A sea of supporters thronged the streets, eager to catch a glimpse of their beloved leaders.
📍 Wayanad, Kerala#Wayanadinte_Priyanka pic.twitter.com/XlMu3yiqJx
— Congress (@INCIndia) October 23, 2024