Download App

YouTuber Elvish Yadav : ईडीची मोठी कारवाई, यूट्यूबर एल्विश यादवची मालमत्ता जप्त

YouTuber Elvish Yadav : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, लोकप्रिय यूट्यूबर एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची

  • Written By: Last Updated:

YouTuber Elvish Yadav : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, लोकप्रिय यूट्यूबर एल्विश यादव ( Elvish Yadav) आणि गायक फाजिलपुरिया (Fazilpuria) यांची सापाच्या विषाच्या अवैध व्यापाराशी संबंधित मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील त्यांची मालमत्ता ईडीने (ED) जप्त केली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.

माहितीनुसार, यापूर्वी ईडीने एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांचे जबाब नोंदवले होते तर या प्रकरणात एल्विश यादवला अटक देखील करण्यात आली होती. यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत या प्रकरणात चौकशी सुरु केली होती.

तर दुसरीकडे सोशल मीडियावर यूट्यूबर एल्विश यादव आणि  गायक फाजिलपुरिया यांचे  प्रचंड चाहते आहे. मात्र  ईडीच्या तपासात दोन्ही आर्थिक अनियमिततेत गुंतलेले असल्याचे आढळून आले त्यामुळे आता त्यांच्या मालमत्तेबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती समोर आली आहे.

यापूर्वी ट्यूबर एल्विश यादवला सापाच्या विषाची खरेदी आणि विक्री केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, ‘या’ दिवशी होणार घोषणा, जयंत पाटलांनी दिले संकेत

एल्विश यादवने आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाचे विष वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी आपल्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचे एल्विश यादवने सांगितले होते. नोएडा पोलिसांनी एप्रिलमध्ये या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले होते.

follow us