जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, ‘या’ दिवशी होणार घोषणा, जयंत पाटलांनी दिले संकेत

  • Written By: Published:
जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, ‘या’ दिवशी होणार घोषणा, जयंत पाटलांनी दिले संकेत

Jayant Patil : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आयोजित शिवस्वराज्य यात्रा (Shivswarajya Yatra) आज अकोलेमध्ये दाखल झाली आहे. या यात्रे दरम्यान सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तुफान फटकेबाजी करत भाजपसह (BJP) विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये 30 सप्टेंबर किंवा 1 ऑक्टोबर रोजी जागावाटपाबाबत शिक्कामोर्तब होणार अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

समोरच्या उमेदवारच्या मागे उभे राहणारे लई कमाविले आहे, त्यांनी एवढा गोला केला आहे की, एका-एका उमेदवारासाठी पंधरा-पंधरा कोटी जमा केले आहेत. अशी टीका देखील विरोधकांवर या सभेमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी केली तसेच मागच्या उमेदवाराला वर्गणी देऊन आमदार केले होते आता अमित भंगारेंसाठी (Amit Bhangare) वर्गणी करा असं देखील जयंत पाटील म्हणाले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत आपण 31 खासदार दिल्लीला पाठवले आहे आणि भाजपचा पराभव केला. आता भाजप आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांना लक्षात आले आहे की येणाऱ्या काळात आपले सरकार येणे शक्य नाही. त्यामुळे तिघेही महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीचा दार उघडून पाहिजे तसे घोषणा करत आहे. सरकारच्या तिजोरी पैसे नसल्याने सरकार आरबीआयकडे (RBI) कर्जासाठी मागणी करत आहे असा टोला देखील यावेळी जयंत पाटील यांनी महायुती सरकारला लावला.

तसेच यापूर्वी सरकारवर आठ लाख कोटीचे कर्ज आहे आणि आता सव्वा लाख कोटीचे कर्ज सरकार मागत आहे. त्यामुळे यांची लाडकी खुर्ची सोडेपर्यंत राज्यावर नऊ – सव्वा नऊ लाखांचा कर्ज होणार आहे असेही ते म्हणाले. अमित शाह (Amit Shah) काल – परवा आले होते तेव्हा त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पराभव करायचा आहे त्यामुळे चांगले काम करा असं आदेश महायुतीच्या नेत्यांना दिला आहे म्हणजेच आपले सरकार जात आहे हे त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली लढाई प्रचंड पैसे खर्च करण्याची ताकद असणाऱ्या लोकांविरोधात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात समोरच्या बाजूने जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे कोणीही विचलित होऊ नये असा आवाहन देखील यावेळी जयंत पाटील यांनी केले.

या मतदारसंघाचे सध्याचे आमदाराने आपला पक्ष सोडून सत्तेत गेले आहे. मागच्या उमेदवाराला वर्गणी देऊन आमदार केले होते मात्र आता अमित भंगारेंसाठी वर्गणी करा कारण आपली लढाई प्रचंड पैसे खर्च करण्याची ताकद असणाऱ्या लोकांविरोधात आहे. असेही यावेळी ते म्हणाले. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दिल्लीमध्ये देखील सत्तापरिवर्तन होणार असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला.

‘लेबनॉन सोडा…’, भारतीय दूतावासाचा नागरिकांना महत्वाचा सल्ला, हेल्पलाइन नंबर जारी 

तसेच महाविकास आघाडीमध्ये 30 सप्टेंबर किंवा 1 ऑक्टोबर रोजी जागावाटपाबाबत शिक्कामोर्तब होणार आहे अशी मोठी घोषणा देखील त्यांनी यावेळी बोलताना केली. शिक्कामोर्तब झाल्यानंतर जे मतदारसंघ आपल्या वाट्याला येणार त्यानंतर आपण उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती त्यांनी या सभेत बोलताना दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube