Punjab Government : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षातील 10 दहापैकी 7 राज्यसभा खासदारांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या खासदारांमध्ये राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा देखील समावेश असल्याने अरविंद केजरीवाल यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
तर दुसरीकडे पंजाब सरकारमधील (Punjab Government) आम आदमी पक्षाचे तब्बल 28 आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) हरियाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे देशातील राजकारणात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.
नवीन जयहिंद (Naveen Jaihind) म्हणाले की, जे खासदार पक्ष सोडून गेले आहे त्यांच्यासोबत दुर्व्यवहार सुरु होता आणि त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव होता. यामुळे पक्षातील नेते अस्वस्थ असून पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे असं माध्यमांशी बोलताना नवीन जयहिंद म्हणाले.
तर दुसरीकडे सात राज्यसभा खासदारांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर आम आदमी पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि मनीष सिसोदीया यांची पंजाबचे मंत्री बलवीर सिंह यांनी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान पंजाबमध्ये बलवीर सिंह ऑपरेशन लोटस राबवत आहे असा दावा केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त शेख सिंह यांच्यावर टीका का होत आहे? 2,832 कोटींचे प्रकरण काय…
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून यापूर्वी भाजपने सात राज्यसभा खासदार फोडून आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. तर आता 28 आमदार देखील पंजाबमध्ये पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पंजाबमध्ये राजकीय समीकरणे बदलणार का? याकडे देखील आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
