‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन

Raghav Chadha suspended : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आम आदमी पार्टीला दुसरा धक्का बसला आहे. खासदार संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढा यांचेही राज्यसभेतून निलंबन करण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. राघव चढ्ढा यांच्यावर अनेक खासदारांनी खोट्या सह्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान, ज्या दिवशी राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर […]

Raghav Chadha

Raghav Chadha

Raghav Chadha suspended : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आम आदमी पार्टीला दुसरा धक्का बसला आहे. खासदार संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढा यांचेही राज्यसभेतून निलंबन करण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. राघव चढ्ढा यांच्यावर अनेक खासदारांनी खोट्या सह्या केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, ज्या दिवशी राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर मतदान झाले, त्याच दिवशी 5 खासदारांनी खोट्या सह्या घेतल्याचा आरोप केला होता. दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर नावांचा उल्लेख करण्यात आला होता. खासदारांनी सांगितले की त्यांनी स्वाक्षरी केली नाही तरीही विधेयकावर सह्या आहेत. तो प्रस्ताव निवड समितीकडे राघव चढ्ढा यांनी पाठवला असल्याचे खासदारांनी सांगितले होते. या सर्व खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

12th Fail Teaser Release : ’12 वी फेलचा’ टीझर गदर 2 सोबत दिसणार; ‘या’ दिवशी येणार चित्रपट

हा वाद चव्हाट्यावर येताच राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी याची चौकशी केली जाईल, असे सांगितले होते. बीजेडीचे खासदार संबित पात्रा, भाजपचे नरहरी अमीन, सुधांशू त्रिवेदी, फांगनॉन कोननायक आणि उपसभापती थंबीदुराई यांनी त्यांच्या सह्या खोट्या असल्याचा आरोप केला. थंबीदुराई हे AIADMK चे खासदार आहेत.

भाजप खासदार पियुष गोयल म्हणाले की राघव चढ्ढा यांच्या विरोधात निलंबनाचा ठराव मांडला आहे. राघव चढ्ढा यांचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर बाब आहे. सदस्यांना न सांगताच त्यांचे नाव यादीत टाकण्यात आले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे.

Exit mobile version