12th Fail Teaser Release : ’12 वी फेलचा’ टीझर गदर 2 सोबत दिसणार; ‘या’ दिवशी येणार चित्रपट
12th Fail Teaser Release : UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक संघर्ष कथा आणि यशोगाथा आपण पाहतो. ऐकतो. त्यात आता या UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर एक चित्रपट यात आहे. ’12 वी फेल’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताचं या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. (Teaser Release of 12th Fail film seen will in theater with Gadar 2)
मोठी बातमी : देशद्रोहाचा कायदा हद्दपार; अमित शाहंची लोकसभेत घोषणा
यामध्ये UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली आहे. जे लोक फेल होतात. मात्र तेथून त्यांना नवी सुरूवात करणं गरजेचं असतं. अशा लोकांसाठी हा चित्रपट आहे. हा चित्रपट अनुराग पाठक यांच्या ’12 वी फेल’ याचं कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केलं आहे. तर झी स्टुडिओजने याची निर्मिती केली आहे.
कर्जत-जामखेडकरांच्या मनात काय? राम शिंदेंनी एकाच वाक्यात सांगून टाकलं
UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर असणारा हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या चित्रपटाचं शूटींग देखील UPSC च्या अभ्यासाचं केंद्र मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील मुखर्जीनगरमध्ये करण्यात आलं आहे. तेथील विद्यार्थ्यांसोबत हे शूटींग करण्यात आलं आहे.
चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. की, UPSC च्या अभ्यासाचं केंद्र मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील मुखर्जीनगरमध्ये असणारी प्रचंड गर्दी, बाजार आणि बॅकग्राऊंडला एक व्हाईस या चित्रपटाच्या कथेबद्दल माहिती सांगत आहे. की येथे दरवर्षी लखो मुलं UPSC चा अभ्यास करायला येतात. ऐक लेक्चर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एका महाविद्यालयात एक विद्यार्थी आपला निकाल पाहतो तेव्हा तो फेल झाला आहे. त्यानंतर चित्रपटाची टॅगलाईन आणि गाणं रिस्टार्ट सुरू होतं.