Download App

राहुल व सोनिया गांधींचे विमान तातडीने भोपाळला उतरविले

  • Written By: Last Updated:

काँग्रेसच्या नेत्या सोनिया आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हे प्रवास करत असलेले विमान तातडीने भोपाळ (Bhopal) विमानतळावर उतरविण्यात आले आहे. खराब हवामानामुळे हे विमान भोपाळला उतरविण्यात आल्याचे वृत्त आहे. बंगळुरू येथे विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यानंतर सोनिया व राहुल गांधी हे दिल्लीला जाण्यासाठी विमानात बसले होते. (Rahul and Sonia Gandhi travel plane emergency landed Bhopal)

नेशन फर्स्ट हेच एनडीएचं धोरण, कोणी कितीही आघाड्या केल्या तरी….; PM मोदींचा विरोधकांना टोला

विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालेला नाही. खराब हवामानामुळे विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले असल्याची माहिती भोपाळचे पोलिस आयुक्त हरिनारायण मिश्रा यांनी दिली आहे. काही वेळ सोनिया गांधी व राहुल हे विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्ये ते थांबले होते. तब्बल दीडतासानंतर साडेनऊ वाजता दुसऱ्या विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

विरोधकांनी INDIA नाव का निवडलं?, जाणून घ्या राजकीय गणितं अन् अर्थ


बेंगळुरू येथे विरोधी पक्षांची मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेससह 26 पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठक काँग्रेसनेच आयोजित केली होती. त्या बैठकीत आता विरोधकांच्या आघाडीला इंडिया असे नावही देण्यात आले आहे.

ही बैठक संपल्यानंतर सोनिया गांधी व राहुल हे दिल्लीकडे विमानाने जात होते. हे विमान भोपाळच्या राजा भोज एअरपोर्टवर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे.

Tags

follow us